Join us

घरी बिर्याणी असेल तर...!  कृष्णा अभिषेकने शेअर केला पत्नी कश्मीराचा बोल्ड फोटो  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2020 3:24 PM

लोकप्रिय कॉमेडियन कृष्णा अभिषेक याची पत्नी कश्मीरा शाह रिअल लाईफमध्ये प्रचंड बोल्ड आणि बिनधास्त आहे. नुकतेच तिने एक बोल्ड फोटोशूट केले...

ठळक मुद्दे 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पप्पू पास हो गया’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कश्मीरा व कृष्णा एकमेकांच्या प्रेमात पडले.

लोकप्रिय कॉमेडियन कृष्णा अभिषेक याची पत्नी कश्मीरा शाह रिअल लाईफमध्ये प्रचंड बोल्ड आणि बिनधास्त आहे. नुकतेच तिने एक बोल्ड फोटोशूट केले आणि हे फोटोशूट पाहून अभिषेक असे काही बोलला की, त्याच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले.होय,  कृष्णा अभिषेकने पत्नी कश्मीरा शाहचा बोल्ड फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. हा फोटो शेअर करताना त्याने दिलेल्या कॅप्शनची लगेच चर्चा सुरु झाली.

‘ घरी बिर्याणी असेल तर तुम्हाला बाहेरची दाल मखनी का खायची? तू तुझ्या ‘हॉट‘ अंदाजात परतलीस, मला तुझा अभिमान आहे,’ असे अभिषेकने कश्मीराचा फोटो शेअर करताना लिहिले.

या फोटोत कश्मीरा ब्लॅक स्विमसूटमध्ये दिसतेय. अभिषेकशिवाय त्याची बहीण आरती सिंग हिनेही वहिनी कश्मीराचा हा फोटो शेअर केला. आरती ‘बिग बॉस 13’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती तेव्हा कश्मीरा तिला सपोर्ट करण्यासाठी बिग बॉसच्या घरात गेली होती.कश्मीरा दीर्घकाळापासून ग्लॅमर दुनियेतून गायब होती. पण या नव्या फोटोशूटच्या माध्यमातून तिने धमाकेदार वापसी केली आहे.

90 च्या दशकात काश्मीराने अनेक सिनेमांत काम केले. येस बॉस, प्यार तो होना ही था, फिर हेराफेरी, कहीं प्यार ना हो जाए, दुल्हन हम ले जाएंगे, जंगल अशा अनेक सिनेमात कश्मीरा दिसली. अनेक चित्रपटांत तिने आयटम सॉन्गही केलेत. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पप्पू पास हो गया’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कश्मीरा व कृष्णा एकमेकांच्या प्रेमात पडले. 2013 मध्ये लास वेगासमध्ये दोघांनी गपचुप लग्न केले होते. काही कॉमन फ्रेंड्समुळे त्या दोघांची ओळख झाली होती. कश्मीराचे हे दुसरे लग्न असून तिचे पहिले लग्न एका उद्योगपतीसोबत झाले होते. 

मला अनफॉलो करा, पण सलमानला काही बोलू नका...!  कश्मीरा शाह ‘भाईजान’वर फिदा

टॅग्स :कृष्णा अभिषेक