Join us

कॉमेडियन कपिल शर्मा रुग्णालयात दाखल

By admin | Published: June 01, 2017 9:26 AM

कॉमेडियन कपिल शर्मा याला बुधवारी अस्वस्थ वाटू लागल्यानं खासगी हॉस्पिटलमधील दाखल करण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 -   कॉमेडियन कपिल शर्मा याला बुधवारी अस्वस्थ वाटू लागल्यानं खासगी हॉस्पिटलमधील दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कपिलला रक्तदाब वाढल्याने लागल्यानं अस्वस्थ वाटू लागले. यामुळे त्याला तातडीनं अंधेरीतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.    
 
""द कपिल शर्मा शो"" या कार्यक्रमाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल आपल्या कार्यक्रमाच्या एपिसोडचे शुटिंग बुधवारी करणार होता. अभिनेता परेश रावल या एपिसोडचे पाहुणे होते. परेश रावल आपला आगामी सिनेमा ""वेलकम टु लंडन""चे प्रमोशन करण्यासाठी ""द कपिल शर्मा शो""मध्ये येणार होते. 
 
सेटवर पोहोचताच कपिल शर्मानं क्रू मेंबर्सना त्याला बरे वाटत नसल्याचे सांगितले. यामुळे कार्यक्रमाचे शुटिंग थांबवण्यात आले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता कपिलला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 
 
हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांनी कपिलला अॅडमिट होण्यास सांगितले. कपिलला रक्तदाब वाढल्यामुळे त्रास झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
 
कपिल शर्माचा सह कलाकार कीकू शारदा याला कपिलच्या प्रकृतीबाबत विचारणा केली असताना त्यानं वृत्ताला दुजारा देत सांगितले की, कपिलला अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले व नंतर पुढील उपचारांसाठी अॅडमिट करण्यात आले. काळजी करण्याचे काही कारण नाही आता कपिलची प्रकृती ठीक आहे.