काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानविरोधात जनक्षोभ उसळलेला असताना कॉमेडीयन मल्लिका दुवा हिने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मल्लिकाने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मल्लिकाने म्हणतेय, संपूर्ण देशात शोकाकुल वातावरण आहे रॅली काढल्या जातात या सगळ्याचा काय उपयोग होणार आहे. देशात रोज लोक अन्न न मिळाल्यामुळे, आजारामुळे दगावतात मात्र तरीही देश सुरु आहेना. राजकारणी आपलं आयुष्य सामान्यपण जगातायेत त्यांच्या आयुष्यात काही फारसा बदल झालेला नाही. मग आपण हे दु:ख कोणासाठी करतोय? मल्लिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. सोशल मीडियावर मल्लिका चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. त्यानंतर मल्लिकाचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर वरुन काढून टाकण्यात आला आहे.
Pulwama Attack : कॉमेडीयन मल्लिका दुवा केले वादग्रस्त वक्तव्य, सोशल मीडियावरुन व्हिडीओ गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 10:53 AM
काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते
ठळक मुद्दे कॉमेडीयन मल्लिका दुवा हिने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहेमल्लिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय