Join us

कॉमेडियन मनीष पॉलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, 'रफुचक्कर' वेबसीरीज मधून प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 10:20 AM

भूमिकेसाठी मनीष पॉलला स्थूल माणसासारखं वजन वाढवायचं होतं आणि तितकंच त्याला कमी करत फिटही दिसायचं होतं.

मनोरंजनसृष्टीतील कलाकार भूमिकेसाठी बरीच मेहनत घेताना दिसतात. त्यांच्यात होणारं ट्रान्सफॉर्मेशन आश्चर्यचकित करणारं असतं. सलमान खान, आमिर खानसारख्या अनेक अभिनेत्यांचं ट्रान्फॉर्मेशन आपण पाहिलं आहे. तर आता होस्ट, कॉमेडियन आणि अभिनेता मनीष पॉलनेही (Manish Paul) आपल्या पहिल्या वेबसिरीजसाठी जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. 'रफूचक्कर' या वेबसिरीजमधून मनीष पॉल चाहत्यांच्या भेटीला आलाय.

'रफूचक्कर' या आगामी वेबसीरीजसाठी मनीष पॉलला स्थूल माणसासारखं वजन वाढवायचं होतं आणि तितकंच त्याला कमी करत फिटही दिसायचं होतं. मनीषने चार महिन्यात वजन वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी मेहनत घेतली आणि डाएट केलं. १० किलो वजन वाढवण्यासाठी मनीषने सर्व मर्यादा तोडत दोन महिने फक्त खाण्यावर जोर दिला. यानंतर केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर बॉडी बनवायलाही त्याला अडीच महिन्यांचा काळ लागला.

मनीष पॉलने एका मुलाखतीत सांगितले, 'मी नेहमीच फीटनेस फ्रीक राहिलो आहे. पण मी जिम फ्रीक नाही. पण मी निरोगी शरिरासाठी काम करतो. रफूचक्करने मला शारिरीक बदलाच्या रोलर कोस्टरमध्येच टाकलं. माझ्या भूमिका पाच वेगवेगळ्या अवतारांमध्ये आहे. पवन कुमार बावरियाच्या भूमिकेसाठी मला माझं फिट शरीर सोडून एक साधारण मुलाचा लुक करावा लागला. यासाठी मी १० किलो वजन वाढवलं. तर आणखी एका लुकसाठी मला जिम ट्रेनरची भूमिका करायची होती यासाठी मी वजन कमी केलं तसंच बॉडी सुद्धा बनवली.'

'रफूचक्कर' वेबसिरीज १५ जूनपासून जिओ सिनेमावर प्रदर्शित झाली आहे. यामध्ये नेहमी कॉमेडी अवतारात दिसणाऱ्या मनीष पॉलचं एकदम वेगळंच रुप बघायला मिळणार आहे.

टॅग्स :मनीष पॉलवेबसीरिजवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स