Join us

तो तर अत्यंत उर्मट आणि वाया गेलेला माणूस; सुनील पालने मनोज वाजपेयीला चांगलंच सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 5:40 PM

राज कुंद्रावर बोलत असताना कॉमेडियन सुनील पाल अचानक मनोज वाजपेयीवर घसरला; वाचा काय आहे कारण

ठळक मुद्देअली फजल, पंकज त्रिपाठी स्टारर ‘मिर्झापूर’ या वेबसीरिजवरही तो बरसला. मिर्झापूर ही सीरिज असभ्य लोकांनी बनवलेलीसीरिज आहे. हे सर्व बॅन व्हायला हवे कारण हे सुद्धा पॉर्न आहे. आपण पाहतो, केवळ तेच पॉर्न नाही. विचारही पॉर्न असतात, असे तो म्हणाला.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला (Raj Kundra) पोर्नोग्राफी प्रकरणी अटक झाली आणि बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणावर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्यात. आता कॉमेडियन सुनील पाल (Sunil Pal) यानेही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पण ही प्रतिक्रिया देताना सुनील पाल असा काही बोलला की, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. राज कुंद्राच्या निमित्ताने सुनील पालने थेट मनोज वाजपेयीवर (Manoj Bajpayee) निशाणा साधला.माध्यमांशी बोलताना सुनीलने या प्रकरणाचा पर्दाफाश केल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन केले. जे काही झाले, ते होणे गरजेचे होते. कारण सध्या काही लोक सेन्सॉरशिप नसल्याचा फायदा लाटतआहेत. सध्या ज्या वेबसीरिज बनत आहेत, त्या घरी कुटुंबासोबत बसून पाहता येत नाही, असे सुनील पाल म्हणाला आणि यानंतर तो अचानक मनोज वाजपेयीवर घसरला.

मनोज वाजपेयी नीच वृत्तीचा माणूसमनोज वाजपेयीसारखे जे 3-4 लोक आहेत, त्यांचा मला तिरस्कार वाटतो. म्हणायला हे बडे स्टार्स आहेत. पण मी त्यांच्यापेक्षा नीच माणसं मी पाहिली नाहीत. मनोज वाजपेयी फॅमिली ऑडियन्ससाठी काय करतोय? देशाने तुम्हाला प्रेसिडेंट अवार्ड दिला आणि तुम्ही अशा वेबसीरिज बनवता, ज्यात पत्नीचे दुसºयासोबत अफेअर आहे. तुमचे दुसरीकडे सुरू आहे. मुलगी बॉयफ्रेन्डबद्दल बोलतेय आणि मुलगा वयापेक्षा कितीतरी पुढे वागतोय. असे कुटुंब दाखवून तुम्ही समाजापुढे काय आदर्श निर्माण करू इच्छिता? असा सवाल सुनील पालने केला. तो मनोज वाजपेयीच्या अलीकडे रिलीज झालेल्या ‘फॅमिली मॅन 2’ या सीरिजच्या पार्श्वभूमीवर बोलत होता.अली फजल, पंकज त्रिपाठी स्टारर ‘मिर्झापूर’ या वेबसीरिजवरही तो बरसला. मिर्झापूर ही सीरिज असभ्य लोकांनी बनवलेलीसीरिज आहे. हे सर्व बॅन व्हायला हवे कारण हे सुद्धा पॉर्न आहे. आपण पाहतो, केवळ तेच पॉर्न नाही. विचारही पॉर्न असतात, असे तो म्हणाला.

टॅग्स :सुनील पालमनोज वाजपेयीराज कुंद्रा