अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महतेनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमच्या मुद्द्यावरून बरेच वाद सुरू आहे. सोशल मीडियावर बरेच वाद सुरू आहे. सुशांत सिंग राजपूतने गायक सोनू निगमने बॉलिवूडच्या म्युझिक इंडस्ट्रीबद्दलचे काही धक्कादायक खुलासे त्याने केले होते. आज सुशांतने आत्महत्या केली, म्युझिक इंडस्ट्रीतही अशा घटना घडू शकतात, असा इशारा त्याने या व्हिडीओतून दिला होता. म्युझिक इंडस्ट्रीतही काही म्युझिक माफिया आहेत. तेच गायकांचे नशीब घडवतात, बिघडवतात. कोणता सिंगर गाणार,कोणता नाही, हे ते ठरवतात, असे त्याने म्हटले होते. त्याने कोणाचे नाव घेतले नव्हते. पण त्यानंतर त्याने एक नवा व्हिडीओ शेअर केला. यात त्याने टी- सीरिजचा सर्वेसर्वा भूषण कुमार यांच्यावर टीका केली.
आता प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पालसोनू निगमच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. सुनील पालने एक व्हिडीओ शेअर करत भूषण कुमारला खरी-खोटी सुनवली आहेत. सुनील पाल म्हणतो, द ग्रेट भूषण कुमार टी- सीरिजचा मालक. लोक तुझ्या पाया पडतात आणि स्वत:ला स्टार समजतात. भाऊ, सोनू निगमला त्रास देणे थांबवा. सोनू निगम हा गॉड ऑफ म्युझिक आहे, एक चांगला व्यक्ती आहे. देवाने त्यांना तन, मन, संपत्ती, सर्व काही दिले आहे. तो कोणत्या कंपनीवर अवलंबून नाही आहे. तो स्वत: एक इंडस्ट्री आहे.
सुनील पुढे म्हणतो, हे विसरू नका की गुलशन कुमारजींनी वेगवेगळ्या कंपन्यांची गाणी डब करुन विकली, कव्हर व्हर्जन टी-सीरिजच्या नावावर बनवून. तेव्हा कुठे गेली होती तुझ्यातली माणुसकी? चोरी करुन तू आपली तिजोरी भरली आहेस आणि तू सोनूला उलट-सुलटं बोलतोस. सोनू निगमने गायलेले हँगओव्हर गाणं सलमान खानकडून डब करुन घेतोस. कुणाला विचारुन तू हे करतोस?, कमाल आहे तुझी. तुझे वडील जिवंत असते तर त्यांनी तुझ्या दोन श्रीमुखात दिल्या असत्या. जागा हो भूषण कुमार. लक्षात ठेव प्रत्येक वाईट गोष्टीचा अंत नेहमी होतो. तुझ्या वडिलांनी टी-सीरिज उभी केली आहे, त्याचा आदर करा. ऑरिजनल काही तरी करण्याची लायकी नाही, रिमिक्स बनवत रहा. थोडी लाज ठेव.. लहान आहेस लहानच रहा, बापा बनण्याचा प्रयत्न करु नकोस.