युट्यूब कॉमेडी चॅनल AIBचा कॉमेडीयन उत्सव चक्रवर्तीवर अनेक अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप ठेवण्यात आला आहे. उत्सव चक्रवर्ती AIBच्या अनेक व्हिडिओमध्ये दिसला आहे.गुरुवारी मुंबईच्या एका राईटर कॉमेडियनने ‘ट्विटर थ्रेड’च्या माध्यमातून उत्सववर हे आरोप केले. उत्सव हा अनेक महिला व अल्पवयीन मुलींना त्यांचे नग्न फोटो पाठवण्यात सांगायचा, असा आरोप महिमा कुकरेजा नामक एका ट्विटर युजरने केला.
यानंतर उत्सवविरोधात एका पाठोपाठ एक अशा अनेक मुलींनी ट्विट केले. उत्सव अश्लिल मॅसेज पाठवायचा आणि न्यूड फोटो मागायचा, असे या मुलींनी म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी या ट्विटची गंभीर दखल घेतली आहे.
दरम्यान उत्सवने हे सगळे आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. ज्यांना मी ओळखतही नाही, ते माझ्याविरोधात गेले आहे. त्यामुळे मी त्यांना दोष देणार नाही. पण जी कहाणी सांगितली जात आहे ती खोटी आहे. तूर्तास मी संयमाने या सगळ्या प्रकरणाला सामोरा जाणार आहे. मी कुठलेही अश्लिल फोटो पाठवले नाहीत, असे उत्सवने म्हटले आहे.या संपूर्ण प्रकरणानंतर AIBने उत्सवची निंदा केली आहे. आम्ही उत्सवच्या या कृत्याची निंदा करतो. आम्ही आमच्या येथील महिलांना सुरक्षित वातावरण दिले आहे. AIB या कहाणीचा भाग असल्याबद्दल आम्हाला खेद आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत आम्ही उत्सवचे सगळे व्हिडिओ चॅनलवरून हटवत आहोत, असे ट्विट AIBने केले आहे.