Join us

कमांडो 3 या चित्रपटातून दिला जाणार हा महत्त्वाचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 6:00 AM

देशासाठी लढणाऱ्या एका कमांडोची कथा कमांडो 3 या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

ठळक मुद्देआपण सगळे एकत्र असून आपल्या सगळ्यांमध्ये एकच कमांडो आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न कमांडो 3 या चित्रपटाद्वारे देण्यात येणार आहे.

कमांडो 3 या चित्रपटाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला असून या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ट्रेलरमधून राष्ट्रीय एकात्मतेचा खूप चांगला संदेश देण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य दत्तने केले असून या चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शहा हे आहेत.

देशासाठी लढणाऱ्या एका कमांडोची कथा कमांडो 3 या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आपल्या देशात देखील अनेक कमांडो आपल्या भारतमातेच्या रक्षणासाठी लढत असल्याचे आपल्याला दिसून येतात. तसेच आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी देखील आजवर अनेकांनी आपल्या प्राणाची आहूती दिली आहे. भगत सिंग, एपीजी अब्दुल कलाम, मौलाना अबुल कलाम आझाद यांसारख्या अनेकांनी आपल्या देशात परिवर्तन घडवण्यासाठी अनेक वर्षं प्रयत्न केले आहेत.

मेरी कोम यांनी नुकतेच बॉक्सिंगमध्ये आठवे मेडल भारताला मिळवून दिले आहे. देशाला जगभरात सन्मान मिळवून देणाऱ्या या मेरी कोम एका अर्थाने कमांडोच आहेत तर महेंद्रसिंग धोनी दोन महिन्यांपासून किक्रेटपासून ब्रेक घेऊन भारतीय जवानांसोबत राहून आपले अनेक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण करत आहे. आपल्या देशात असे अनेक कमांडो आहेत. पण त्याचसोबत लोकांना माहीत नसणारे देखील अनेक हिरो आहेत.

विपुल शाह सांगतात, कमांडो ३ या चित्रपटाची कथा खूपच चांगली असून हा चित्रपट केवळ ॲक्शन थ्रिलर चित्रपट नाहीये तर एका माणसाची कथा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आपण सगळे एकत्र असून आपल्या सगळ्यांमध्ये एकच कमांडो आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटाद्वारे करत आहोत. आपल्या देशात कोणतीही समस्या आली तर प्रत्येकजण एकमेकांना मदत करतो. प्रत्येक व्यक्तीत असलेल्या कमांडोला कमांडो हा चित्रपट सलाम करतो. 

आदित्य दत्त सांगतात, हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना एकात्मतेचा संदेश मिळणार आहे. कमांडो 3 हा चित्रपट देशातील शूरांना सन्मान करतो. 

कमांडो 3 या चित्रपटात विद्युत जामवाल, अदा शर्मा, अंगिरा धर आणि गुलशन दैवय्या यांच्या मुख्य भूमिका आहेत.

टॅग्स :विद्युत जामवालकमांडो