Join us

Commando 3 Trailer : कमांडो 3 या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 15:38 IST

कमांडो 3 हा चित्रपट 29 नोव्हेंबरला प्रदर्शित होत असून हा चित्रपट एक मसाला एन्टरटेन्मेंट असणार असल्याचे या चित्रपटाचा ट्रेलर पाहूनच लक्षात येत आहे.

ठळक मुद्देकमांडो 3 मध्ये आता करण सिंग डोगराला म्हणजेच विद्युतला ज्या खलायकाला तोंड द्यायचे आहे तो खलनायक देशातील नव्हे तर विदेशातील आहे. हा खलनायक लोकांचे ब्रेन वॉश करून भारतावर हल्ला करण्यासाठी त्यांना भडकवणार आहे.

कमांडो या प्रसिद्ध चित्रपटाचा तिसरा भाग असलेला कमांडो 3 या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून यात विद्युत जामवालचा ॲक्शन अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तसेच या ट्रेलरमध्ये दमदार संवाद देखील आपल्याला ऐकायला मिळत आहे. हा चित्रपट 29 नोव्हेंबरला प्रदर्शित होत असून हा चित्रपट एक मसाला एन्टरटेन्मेंट असणार असल्याचे या चित्रपटाचा ट्रेलर पाहूनच लक्षात येत आहे.

कमांडो 3 या चित्रपटाची निर्मिती आदित्य दत्त करत असून य चित्रपटात विद्युतसोबतच अदा शर्मा, अंगीर धर, गुलशन देवाईया यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे पहिले दोन्ही भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यापासून याच ट्रेलरची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या ट्रेलरमध्ये विद्युतचा ॲक्शन अंदाज तर पाहायला मिळतोय तर त्याचसोबत अदा शर्मा देखील एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

कमांडो 3 मध्ये आता करण सिंग डोगराला म्हणजेच विद्युतला ज्या खलायकाला तोंड द्यायचे आहे तो खलनायक देशातील नव्हे तर विदेशातील आहे. हा खलनायक लोकांचे ब्रेन वॉश करून भारतावर हल्ला करण्यासाठी त्यांना भडकवणार आहे. हा हल्ला रोकण्यासाठी करण सिंग डोंगरा इंग्लंडला जाणार आहे. तो त्याच्या साथीदारांसोबत हा हल्ला रोकण्याचा कशाप्रकारे प्रयत्न करतो हे आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 

या चित्रपटाचा ट्रेलर लोकांना प्रचंड आवडत असून केवळ 24 तासांत या चित्रपटाला 17 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. याविषयी विद्युत सांगतो, कमांडो 3 ला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबाबत मी प्रचंड खूश असून कमांडो या चित्रपटाचे सगळेच भाग माझ्यासाठी खूप खास आहेत. या चित्रपटाच्या तिसऱ्या सिझनमध्ये प्रेक्षकांना अनेक सरप्राईज मिळणार आहेत. 

टॅग्स :कमांडोविद्युत जामवाल