Join us

गायक मिका सिंहविरोधात महिलेची विनयभंगाची तक्रार

By admin | Published: July 06, 2016 11:07 AM

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मिका सिंहविरोधात एका महिलेने विनयभंगाची तक्रार नोंदवली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मिका सिंहविरोधात एका महिलेने विनयभंगाची तक्रार नोंदवली आहे.  फॅशन डिझायनर व मॉडेल असलेल्या या महिलेने वर्सोवा पोलिस स्थानकात मिकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. एका कामासंदर्भातील पैसे मागण्यासाठी आपण मिकाला भेटण्यास गेलो असता, त्यावेळी मिकाने आपल्याशी गैरवर्तन केले, असा आरोप त्या महिलेने केला आहे. 
याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.  दरम्यान, मिकानेही या मॉडेलविरोधात तक्रार दाखल केली आहे.  संबधित मॉडेलने धमकी देऊन 5 कोटी रुपये मागितल्याचा आरोप करत मिकाने वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.