बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रणबीर कपूरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अभिनेत्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. रणबीरचा ख्रिसमस सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे रणबीर आणि कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
रणबीरने कुटुंबीयांबरोबर ख्रिसमस सेलिब्रेट केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओत त्याने केकवर दारू ओतून आग लावल्याचं दिसत होतं. त्यानंतर जय माता दी असं रणबीर म्हणताना दिसला होता. या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोलही केलं होतं. त्यानंतर आता रणबीर आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील संजय तिवारी यांनी मुंबई उच्च न्यायालयात रणबीरविरोधात तक्रार केली आहे. जय माता दी बोलल्याने त्याच्यावर हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हिंदू धर्मात कोणतंही शुभ कार्य करण्याअगोदर शुद्ध वस्तूंची आहुती देत अग्नी देवतेचं आवाहन केलं जातं. पण, रणबीर कपूरने दारूसारख्या गोष्टीचा वापर करून जय माता दी बोलल्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. रणबीरबरोबरच त्याचे कुटुंबीयही जय माता दी बोलले. या सगळ्यांनी मुद्दाम हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे.