Join us

Confirm या तारखेला 'देवमाणूस' मालिकेचा शेवटचा भाग रसिकांना पाहायला मिळणार, असा होणार शेवट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 16:46 IST

. या नव्या मालिकेचे प्रोमो सध्या छोट्या पडद्यावर झळकू लागले आहेत. प्रोमोवरुन या मालिकचे कथानक रहस्यमयी किंवा हॉरर स्वरुपाचे असेल असंच दिसतंय.मालिकेत विजय कदम यांची मुख्य भूमिका आहे.

लोकप्रिय मालिका 'देवमाणूस' सध्या प्रचंड चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली आहे. मालिकेतील कलाकारांच्या दमदार अभिनयाने रसिकांच्या मनात घर केले आहे. सुरुवातीपासून मालिकेतल्या वेगळ्या कथानकामुळे मालिकेची प्रचंड चर्चा झाली होती. आता ही मालिका लवकरच रसिकांचा निरोप घेणार आहे.

 

 

१४ किंवा १५ ऑगस्ट रोजी देवमाणूस मालिकेचा शेवटचा एपिसोड रसिकांना पाहायला मिळणार आहे.या मालिकेच्या जागी 'ती परत आलीये' ही नवीन मालिका रसिकांच्या भेटीला दाखल होणार आहे. या नव्या मालिकेचे प्रोमो सध्या छोट्या पडद्यावर झळकू लागले आहेत. प्रोमोवरुन या मालिकचे कथानक रहस्यमयी किंवा हॉरर स्वरुपाचे असेल असंच दिसतंय.मालिकेत विजय कदम यांची मुख्य भूमिका आहे.

विजय कदम हे बऱ्याच कालावधी नंतर टीव्हीवर पुनरागमन करणार आहेत. प्रोमोमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं कि विजय कदम एका परिसरात गस्त घालत आहेत आणि त्या परिसरामध्ये हत्या होते त्यामुळे सावध राहा अशी चेतावनी देताना दिसत आहेत. नक्की ही भानगड काय आहे? या मालिकेत अजून कोण कलाकार असणार आहेत? ही सर्व माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे.

या मालिकेचं लेखन 'देवमाणूस' या लोकप्रिय मालिकेचे लेखक स्वप्नील गांगुर्डे यांनीच केलं आहे. त्यामुळे ही मालिका देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवणार यात शंकाच नाही.या मालिकेबद्दल बोलताना विजय कदम म्हणाले, "या मालिकेत एक रहस्यमय भागातील गूढ प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इकडे आलेल्या लोकांचं काही रहस्य आहे का? ती परत आलीये म्हणजे नक्की कोण? या प्रश्नाची उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळतील. एका रहस्यमय मालिकेत काम करताना मी खूप उत्सुक आहे. माझी भूमिका नक्की काय आहे हे सगळ्यांना लवकरच कळेल. प्रेक्षक या भूमिकेवर प्रेम करतील अशी माझी खात्री आहे."

टॅग्स :किरण गायकवाडविजय कदम