ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - आलिया-वरुण-सिद्धार्थ यांनी अभिनय केलेल्या स्टुडंट ऑफ द ईयर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची तयारी सुरु झाली आहे. कऱण जोहर या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटात पुर्वी दिशा पटानीला घेण्यात आल्याचे वृत्त होते. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमृता सिंह आणि सैफ अली खान यांची मुलगी सारा अली खान 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. टायगर श्राफ या चित्रपटात मुख्य भूमिका करणार असल्याचे यापुर्वीच फिक्स झाले आहे. साराने प्रथम या चित्रपटाला नकार दिल्यानंतर दिशा पटानीच्या झोळीत हा चित्रपट गेला होता.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करण जोहरनं या चित्रपटाचा करार करताना एक अट घातली होती. टॅलेन्ट मॅनेजमेंट एजन्सीमध्ये अॅडमिट व्हावं लागण्याची ती अट होती. ही अट साराची आई अमृता सिंह हिला मान्य नव्हती. त्यामुळे त्यामुळे सारा अली खाननं प्रथम चित्रपट नाकारला होता. पण करीना खानने आपल्या पतीकडे साराची बॉलिवूड एन्ट्री करणच्या चित्रपटातूनच करावी अशी गळ घातल्यानंतर सैफने हा निर्णय घेत्याचे प्राथमिक वृत्त आहे.
काही दिवसांपूर्वी मसाबा गुप्तांनी इन्स्ट्राग्रामवर साराचा फोटो शेअर केला होता. त्यामुळे ती मीडियाच्या चर्चेत आली होती. लवकरच ती सिनेमात झळकेल, असं ट्विटही त्यावेळी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्तांनी केलं होतं.