Join us  

सलमान, सूरज को बधाई हो बधाई

By admin | Published: November 14, 2015 11:21 PM

व्यावसायिक चित्रपटांच्या यशस्वितेसाठी मोठ्या स्टारची गरज असते, हे म्हणणे होते या क्षेत्रातील दिग्गज मनमोहन देसाई यांचे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर मनमोहन देसार्इंसारखे दिग्दर्शकही

व्यावसायिक चित्रपटांच्या यशस्वितेसाठी मोठ्या स्टारची गरज असते, हे म्हणणे होते या क्षेत्रातील दिग्गज मनमोहन देसाई यांचे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर मनमोहन देसार्इंसारखे दिग्दर्शकही बड्या स्टार्सचे महत्त्व मान्य करत होते. हे सांगण्याचे कारण एवढेच की, ‘प्रेम रतन धन पायो’ या सूरज बडजात्या यांच्या चित्रपटाच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर यशस्वी सुरुवात केली आहे. मैने प्यार किया आणि हम आपके हैं कौन या चित्रपटांच्या यशस्वितेनंतर सूरज बडजात्या यांची ओळख एक अशा दिग्दर्शकाच्या रूपात झाली,ज्यांनी सशक्त कथानकासह हिंदी चित्रपटाची दिशा आणि दशा बदलली. मैने प्यार कियाने सलमानला स्टार बनविले तर हम आपके है कौनमध्ये स्टार बनलेल्या सलमानला घेऊन सूरज यांनी एका दमदार कथानकासह चित्रपट यशस्वी केला. या दोन चित्रपटांनंतर मात्र सूरज यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. हम साथ साथ है या चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर मोठे यश मिळाले नाही. करिना कपूर, हृतिक रोशन, अभिषेक बच्चन यांच्या सोबतची त्रिकोणी प्रेमकथा मै प्रेम दिवानीला यश मिळू शकले नाही. त्यानंतर २००६ मध्ये आलेल्या शाहीद कपूरसोबतच्या विवाहमध्ये सूरज यांच्या दिग्दर्शनाची चुणूक पुन्हा दिसून आली. विवाहच्या यशानंतर मात्र सूरज यांच्या यशाचा आलेख फारसा समाधानकारक नव्हता. त्यानंतर सूरज यांनी सलमानला सोबत घेऊनच चित्रपट करण्याचे ठरविले आणि आता दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यानंतर सलमानसोबतच्या चित्रपटाचा रिझल्ट सर्वांसमोर आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर दोन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. पहिली बाब ही आहे की, सलमानसारख्या स्टारने चित्रपटाला यश मिळवून दिले आहे. मात्र दिग्दर्शनाच्या बाबतीत सूरज बडजात्या एक असा चित्रपट बनविण्यात अयशस्वी ठरले आहेत जो मैने प्यार किया आणि हम आपके है कौनसारखे चित्रपट निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकांच्या क्षमतेशी बरोबरी करू शकत नाही. सलमान सुपरस्टार आहे. त्याने अनेक साधारण चित्रपटांनाही यश मिळवून दिले आहे. त्यामुळे प्रेम रतन धन पायो हाही असाच चित्रपट आहे जो दिग्दर्शकाला मोठ्या स्टारला सोबत घेण्यास भाग पाडतो. सूरज यांच्यासारख्या दिग्दर्शकांनाही स्टारची पडलेली भुरळ हे वास्तव आहे. या चित्रपटासाठी सलमान आणि सूरज यांना बधाई.