राज्यात आणि देशात कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन शासन आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात संचारबंदी लागू केली आहे.
कलाकारांनी स्वत:ला आसोलेटेड केले आहे. 31 मार्चपर्यंत सर्व शूटिंग रद्द झाल्याने घरात राहणंच पसंत केले आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या घरात राहुन जेवण करायला शिकते आहे. सोशल मीडियावर तिने जेवण करतानाचे आणि झाल्यानंतरचे फोटो शेअर केले आहेत. सोनालीच्या फॅन्सनी तिचं कौतूक केलं आहे.
गेल्या 24 तासांत 15 नव्या संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात मुंबईत 14, पुण्यातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 89वर पोहोचली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतले कलाकार कोरोना व्हायरस विरूद्ध लढण्यासाठी एकवटले आहेत. त्यांनी सर्वांनी मिळून एक व्हिडिओ तयार करून त्यातून त्यांच्या चाहत्यांना व लोकांना वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घेण्याच्या सूचनेसोबतच घरी थांबण्याचे व सरकारला सहाकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
या व्हायरसला घाबरू नका जागरूक व्हा. काळजी घ्या स्वतःची आणि दुसऱ्याचीही. कोरोना प्राण्यांमुळे होतो अशा गैरसमजामुळे लोकांनी त्यांच्या पाळीवर प्राण्यांना रस्त्यावर सोडले आहे. कृपया करून आपल्या पाळीव प्राण्यांना रस्त्यावर सोडू नका, असेही या व्हिडिओतून सांगण्यात आले आहे.