लंडनमधून परतल्यावर कनिकाने सेल्फ आयसोलेशनमध्ये जाणे अपेक्षित होते. पण याऊलट कनिकाने काही पार्ट्यांना हजेरी लावली. या कमालीच्या निष्काळजीपणाबद्दल कनिका प्रचंड ट्रोल झाली. इतकेच नाही तर याप्रकरणी तिच्याविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले. कनिकाला सध्या लखनौच्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इंन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. पण इथे तिच्या नख-यांमुळे रूग्णालयाचा अख्खा स्टाफ वैतागला आहे. त्यामुळे तिला सेलिब्रेटीप्रमाणे नाही तर एका पेशंटप्रमाणे राहण्याची ताकीदच आता डॉक्टरांनी दिली आहे. आता कनिकाबद्दल आणखी एक बातमी आहे.
रूग्णालयात इतर करोनाग्रस्तांपेक्षा जास्त सुविधा तिला पुरवण्यात येत असल्याचे माहिती समोर येत आहे. तिच्या खाण्यापिण्याकडेही इतरांपेक्षा जास्त लक्ष दिले जात आहे. तिला ग्लुटेन फ्री जेवण देण्यात येत आहे. ज्या रूममध्ये ती अॅडमिट आहे तिथेही लक्झरियस सुविधा देण्यात आल्या आहेत. बेड आणि टीव्हीची सुविधा पुरविण्यात आली आहे. हॉस्पिटल कमी एखाद्या हॉटेलप्रमाणेच तिला सुविधा देण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. यामुळे कनिकाचा रूग्णालयातही मोठा थाटच सुरू असल्याचे समजते.
तसेच हॉस्पिटल प्रशासनाला ही भीती आहे की कनिका कपूर तिथून पळून जाण्यासाठी प्रयत्न करेल आणि दुसऱ्यांकडे व्हायरस पसरवेल. त्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाने तिच्यासाठी एक्स्ट्रा सुरक्षारक्षक तैनात केला आहे.