Corona Effect: हिला नाही कोरोनाची भीती युजर्स म्हणाले, क्यों की ओ है ही नही इस दुनिया की !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 12:16 PM2020-03-19T12:16:45+5:302020-03-19T12:19:36+5:30
अनेक टीव्ही शोज केल्यानंतर 2003 साली हृतिक रोशन स्टारर ‘कोई मिल गया’ या चित्रपटात काम करण्याची संधी तिला मिळाली होती.
कोरोना व्हायरसचा धोका सतत वाढत असताना सामान्य जनतेपासून तर बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच या व्हायरसच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी विलीगीकरणाचा मार्ग पत्करल्याचे चित्र आहे. सगळेच सेलिब्रेटी या संसर्गातून कशाप्रकारे बचाव करावा याविषयी जनजागृती करत पुढे येत आहेत. तर एक अभिनेत्री म्हणजे हंसिका मोटानी सध्या मालदीव्हजमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करण्यात व्यस्त आहे.
जगात कोरोनाने थैमान घातले असताना या अभिनेत्रीचे अशा प्रकारे बाहेर फिरणे युजर्सनाही चांगलेच खटकले आहे. त्यामुळे एक से बढकर एक कमेंट करत तिची फिरकी घेत आहेत तर कोणी तिची खिल्ली उडवत आहेत. तर काहींनी तिला कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराचा संसर्ग होण्याच धोका फार कमी आहे कारण, ''ओ है ही नही इस दुनिया की'' अशाही कमेंट करत खिल्ली उडवत असल्याचे पाहायला मिळत आहे.
2003 मध्ये ‘शाका लाका बूम बूम’ या हिंदी मालिकेतून बालकलाकार म्हणून हंसिकाने तिच्या करिअरची सुरूवात केली.हंसिका दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे. अनेक टीव्ही शोज केल्यानंतर 2003 साली हंसिकाला हृतिक रोशन स्टारर ‘कोई मिल गया’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटातही हंसिका बालकलाकार म्हणून दिसली.
2007 साली हंसिका हिमेश लीड अॅक्ट्रेस म्हणून रेशमियासोबत ‘आपका सुरूर’ या चित्रपटात झळकली. पण तिला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का असला होता. याचे कारण म्हणजे या चित्रपटाच्या वेळी हंसिका केवळ 16 वर्षांची होती आणि तिने स्वत:पेक्षा 18 वर्षे मोठ्या हिमेश रेशमियासोबत रोमान्स केला होता.
याशिवाय चित्रपटात हंसिका वयापेक्षा बरीच मोठी दिसत होती. यानंतर लवकरच मोठे होण्यासाठी हंसिकाने हार्मोनल इंजेक्शन घेतल्याचीही चर्चा रंगली होती. अर्थात हंसिका किंवा तिच्या कुटुंबीयांनी काहीही बोलण्यास नकार दिला होता.