Join us

Corona Virus: कोरोनाने बाधित कनिका कपूर स्त्री नसून आहे पुरूष ? आला धक्कादायक मेडिकल रिपोर्ट हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 13:16 IST

कनिकाची मेडिकल रिपोर्टमध्ये नमुद करण्यात आलेल्या गोष्टी खोट्या आहेत.

कनिका कपूर कोरोना बाधित असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहे. कोरोना संक्रमण होवूनही कनिकाने पार्ट्यांमध्ये हजेरी लावली त्यानंतर सर्वच स्थरांवरून तिच्यावर आगपाखड सुरू झाली. इतकेच नाही तर ज्या रूग्णालयात तिच्यावर उपाचर सुरू आहेत तिथे ती सेलिब्रेटी स्टेटस जपत असल्याचे समोर आले आहे. दिवसेंदिवस अनेक गोष्टी कनिकाबद्दल समोर येत असताना अजून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ते म्हणजे कनिकाची मेडिकल रिपोर्टमध्ये नमुद करण्यात आलेल्या गोष्टी खोट्या आहेत.

 तिचे वय आणि स्त्री लिंगच्या जागी पुरूष लिंग नमुद करण्यात आले आहे. कनिकाचे वय हे रिपोर्टमध्ये चक्क 28 वर्ष दाखवण्यात आले असून जेव्हा तिचे खरे वय हे 41 वर्ष आहे. हेच मेडिकल रिपोर्ट सध्या खूप व्हायरल झाली आहे. हे मेडिकल रिपोर्ट पाहून तिच्या घरच्यांनाही आश्चर्य वाटत आहे. रिपोर्टमध्ये तिच्याविषयीची माहिती लपवण्याचे कारण काय, हे अद्याप समजू शकलेले नाही.तसेच मेडिकल रिपोर्ट कुटुंबियांआधीच अशाप्रकारे व्हायरल होण्यामुळे कुटुंबियांची देखील झोप उडाली आहे. कनिकाला कोरोना झाल्याचे कळताच या साऱ्यांबरोबर प्रशासनाचेही धाबे दणाणले आहेत. कारण या पार्ट्यांना केंद्रीय मंत्री, राज्य मंत्री, माजी मुख्यमंत्री आणि बॉलिवूडचे सेलिब्रेटींसह उद्योजक जमले होते.

कनिकाने यावेळी अनेकांसोबत हस्तांदोलन केले, गळाभेट घेतली, सेल्फीही काढले. एवढेच नाही तर त्या पार्ट्यांना खाद्यपदार्थ सर्व्ह करणाऱ्या वेटरपासून ते मॅनेजरपर्यंत साऱ्यांनाच कोरोनाच्या धास्तीने ग्रासले आहे. आरोग्य विभागाने कनिकाच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्यासाठी आणि तपासणीसाठी तब्बल १०० टीम तयार केल्या आहेत. 

टॅग्स :कनिका कपूरमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस