Join us

कोरोनाचे थैमान : भूमी पेडणेकरने 24 तासांत दोन आप्तांना गमावले, मावशीसाठी जोडले हात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 18:13 IST

Bhumi Pednekar : गेल्या 24 तासांत भूमीने आपल्या दोन जवळच्या लोकांना गमावले. शिवाय अन्य तिघांची प्रकृती गंभीर आहे. 

ठळक मुद्देदु:खासाठी जागा नाही. आता फक्त अ‍ॅक्शन. खरोखर हे संपण्याची वाट बघू शकत नाही. कृपया थोडे योगदान द्या, असे तिने एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

त्सुनामी बनून आलेल्या कोरोनाच्या लाटेने देशभर हाहाकार माजला आहे. सर्वत्र दहशत आणि भीतीचे वातावरण आहे. ऑक्सिजन, बेड्सअभावी रूग्णांना जीव गमवावा लागत आहेत. सामान्यांच नाही तर सेलिब्रिटींनाही कोरोना व्हायरसने असा काही घाव दिला की, तो भरून निघणे कठीण आहेत. अनेक सेलिब्रिटींनाही त्यांच्या आप्तांसाठी बेड्स मिळवण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यापैकीच एक. गेल्या 24 तासांत भूमीने आपल्या दोन जवळच्या लोकांना गमावले. शिवाय अन्य तिघांची प्रकृती गंभीर आहे. दिल्लीतील तिच्या मावशीला तातडीने व्हेंटिलेटर बेड हवा आहे. या मावशीला बेड मिळावा म्हणून भूमीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित मदत मागितली आहे. हात जोडून विनंती करते, प्लीज मदत करा, तातडीने कळवा, असे कळकळीची विनंती तिने केली आहे.

मावशीसाठी जोडले हात...

दिल्लीतील माझ्या मावशीला तातडीने व्हेंटिलेटर बेड हवा आहे. ती आयसीयूमध्ये आहे. पण तिला तातडीने हलवावे लागणार आहे. मदत करू शकत असाल तर कृपया कळवा... मी हात जोडून विनंती करते, असे ट्विट भूमीने केले. 

शेअर केले दु:ख

24 तासांत मी माझ्या दोन अतिशय जवळच्या व्यक्ति गमावल्या. ज्यांच्यावर आमचे खूप प्रेम होते. अन्य 3 जवळच्या नातेवाईकांची प्रकृती गंभीर आहे. संपूर्ण दिवस त्यांच्यासाठी ऑक्सिजन व बेड्स शोधण्यासाठी घालवला. दु:खासाठी जागा नाही. आता फक्त अ‍ॅक्शन. खरोखर हे संपण्याची वाट बघू शकत नाही. कृपया थोडे योगदान द्या, असे तिने एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :भूमी पेडणेकर