भारतात लॉकडाउन जाहीर केल्यामुळे इतर सेलिब्रेटींप्रमाणे कॉमेडियन सुनील ग्रोव्हर सध्या सेल्फ कॉरंटाईनमध्ये आहे. अशामध्ये सुनीलला खूप काही शिकायला मिळत आहे आणि जुन्या सवयी पुन्हा एन्जॉय करायला मिळत आहेत. सुनील सोशल मीडियावर मजेशीर जोक्सदेखील शेअर करत आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, सुनीलने सांगितले की, तो क्वारंटाईनमध्ये कसा आणि काय काय करून वेळ व्यतित करत आहे.
सुनीलला विचारण्यात आले की, सध्या तो क्वारंटाईनमध्ये काय करत आहे. त्यावर त्याने सांगितले की, सध्या घरातील कामात लक्ष देत आहे. झाडू, लादी व भांडी कपडे धुवत आहे. सोबतच घरात जेवणही बनवत आहे.
त्याने पुढे म्हटले की, मी इतके पदार्थ बनवायला शिकलो आहे आणि आता इतक्या जलदरितीने भाज्या कापतो की असं वाटतं की नंतर मी हायवेवर स्वतःचा ढाबा सुरू करेन.
सुनील ग्रोव्हरला विचारले की सोशल मीडिया किंवा युट्युबच्या माध्यमातून काही नवीन करण्याचा विचार आहे का. कारण सध्या तो चित्रपट व टेलिव्हिजनवर काहीही काम करत नाही आहे. त्यावर सुनील म्हणाला की, आता मी घरी लक्ष देत आहे. सगळे काही नीट झाले की काहीतरी सुरू करणार आहे.
यावेळी सुनील ग्रोवरने लोकांना आवाहन केले आहे. तो म्हणाला की, सर्व मेडिकल स्टाफ, डॉक्टर्स, नर्स, साफसफाई करणाऱ्या सर्व लोकांचा मी आभारी आहे. मी लोकांना सांगू इच्छितो की, या लोकांना मदत करा. त्यांचे काम वाढवू नका. कोरोना कोणत्यातरी गावातील राक्षसासारखा आहे. ज्यापासून आपला बचाव केला पाहिजे. त्यामुळे घरात थांबा, बाहेर पडू नका.