Join us

Coronavirus: कनिका कपूरवर टीकेची झोड, कुणी म्हणतंय बेजबाबदार तर कोणी बेबी डॉलिश वर्तणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 1:45 PM

कनिका कपूरवर कुणी टीका करतंय तर कुणी तिला लवकर बरं वाटावे म्हणून प्रार्थना करत आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूर सध्या चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे एकीकडे जगात कोरोनाची दहशत असताना कनिका लंडनवरून पतरल्यानंतर तिला कोरोनाची लागण झाल्याचं नुकतंच समोर आलं आहे. ती 9 मार्चला लंडनवरून परतली आणि स्वतःला आइसोलेशनमध्ये ठेवले नाही. तिने बऱ्याच पार्टी अटेंड केल्या. शुक्रवारी असे वृत्त समोर आले की तिची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर बॉलिवूडपासून सामान्य लोकांनामध्ये भीतीचं वातावरण पसरलेले पहायला मिळाले. त्यामुळे कुणी तिच्यावर टीका करतंय तर कुणी तिला लवकर बरे वाटावे म्हणून प्रार्थना करत आहे.

प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहिरी यांनी स्पॉटबॉयशी बोलताना सांगितले की, कनिका जर लंडनमध्ये होती तर तिने भारतात यायला नको होते. ही सर्वात मोठी पहिली चूक तिने केली. त्यासाठी मी तिलाच जबाबदार समजतो. मी गणपती बप्पाचा भक्त आहे. मी देवाकडे प्रार्थना करतो की ती लवकर बरी होऊ दे. ती लवकरच बरी होईल.

अनुप जलोटा म्हणाले की, लंडन से आया मेरा दोस्त, दोस्त को क्वारंटाइन करो... कनिकाला माहित होते की, मी परदेशातून भारतात परतल्यानंतर 14 दिवस सेल्फ आइसोलेशन करत होतो. आम्ही दोघे पण लंडनरून वेगवेगळ्या दिवशी भारतात पोहचलो. तिने चूक केली. मला आश्चर्य वाटतं की तिने अटेंड केलेल्या पार्टीमध्ये बरेच राजकीय नेते होते. यात सगळेच दोषी आहेत.

उदीत नारायण, गायक - कनिकाचं वर्तणूक पाहून मला खूप आश्चर्य वाटतं आहे. ती शिकलेली महिला आहे. ती कशी काय अशी बेजबाबदार वागू शकते? मला असं कळलं की ती एअरपोर्टवर कोरोनाच्या टेस्टपासून पळ काढण्यासाठी रेस्टरूममध्ये लपून बसली होती. लहान मुलांसारखी कशी ती वागू शकते ? आता तिने संपूर्ण लखनऊला डेंजर झोनमध्ये समाविष्ट केले आहे. तिच्यासोबत जे पार्टीत होते आणि राजकीय मंडळी तिच्या मूर्ख वर्तणूकीमुळे अडचणीत सापडले आहेत. ते आता म्हणताहेत की तिच्यामुळे कुणाचा जीव गेला तर तिच्यावर हत्येची केस दाखल करू. स्वतःला अशा परिस्थितीत का अडकवता? सध्या आपण खूप कठीण परिस्थितीतून जात आहोत. सगळ्यांनी जबाबदारीनं वागले पाहिजे. तुम्ही गरीब आहात की श्रीमंत, याचा इथे काहीही संबंध नाही. मी ऐकले की तिने खळबळ माजवल्यानंतर टेलिव्हिजनवर आली होती. आश्चर्य वाटले तिच्या मोठ्या मोठ्या बाता ऐकून. हात जोडून देशाची माफी मागण्याऐवजी स्वतःला निरागस असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करते आहे. हद्द झाली. 

बाबुल सुप्रियो, गायक - खूप अयोग्य आणि बेबी डॉलिश वर्तणूक आहे. पण मला आशा आहे की ती लवकर बरी होईल. तिच्यासोबत जे कोणी पार्टीत होते ते देखील सुरक्षित असतील. तिच्यासोबत जे जे पार्टीत होते ते सगळेच दोषी आहेत.

मनोज मुंताशीर, गीतकार - सध्या देशात आपत्ती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत आपण सगळ्यांनी जबाबदार नागरिकासारखे वागले पाहिजे. स्वतःसोबत दुसऱ्याच्या तब्येतीचा विचार केला पाहिजे. नो पार्टी, नो सेलिब्रेशन...या सगळ्या गोष्टींपेक्षा जीवन खूप महत्त्वाचे आहे. कनिका कपूरनेही संयम बाळगायला पाहिजे होता. ती एक सेलिब्रेटी आहे तिला लोक फॉलो करतात. तिने जगासमोर वाईट पायंडा टाकला आहे.

टॅग्स :कनिका कपूरकोरोना वायरस बातम्याअनुप जलोटाबप्पी लाहिरीबाबुल सुप्रियो