बॉलिवूड सिंगर कनिका कपूरला कोरोनाचा संसर्ग झाला आणि सगळीकडे खळबळ माजली. कनिकाची पाचवी कोरोना चाचणीही पॉझिटीव्ह आली आहे. करोनाबाधित रुग्णाची दर ४८ तासांनी चाचणी करण्यात येते. कनिकाच्याही अशा चार टेस्ट करण्यात आल्या. या चारही टेस्ट पॉझिटीव्ह आल्या आणि आज पाचव्या चाचणीचा अहवालही पॉझिटीव्ह आला. सध्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये कनिकावर उपचार सुरु आहेत. पण कनिकाचे कुटुंब मात्र या उपचारांवर फारसे समाधानी नसल्याचे दिसतेय.
होय, कनिकावर 20 दिवसांपासून उपचार सुरु आहे. नेमक्या यावर कनिकाच्या कुटुंबाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शेवटी आपल्या मुलीच्या उपचाराला इतका वेळ का लागतोय, असा प्रश्न तिच्या आई-वडिलांनी उपस्थित केला आहे. कनिकामध्ये कोरोनाची कुठलेही लक्षणे नाहीत. तिच्या सहवासात आलेल्यांचेही रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. कनिका अगदी सामान्यरित्या खातपित आहे. असे असताना तिला आयसोलेशनमध्ये का ठेवलेय, ती बरी व्हायला इतका वेळ का लागतोय, असा सवाल कनिकाच्या कुटुंबाने विचारला आहे.
सोमवारी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित कनिकाने तिचा पुढचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल, अशी आशा व्यक्त केली होती. ‘मी आयसीयूमध्ये नाही. माझी तब्येत ठीक आहे. पुढचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल, अशी आशा करते़ माझ्या मुलांची आणि कुटुंबीयांची खूप आठवण येत आहे, असे तिने पोस्टमध्ये लिहिले होते. पण कनिकाची निराशा झाली. कारण तिची पाचवी टेस्टही पॉझिटीव्ह आली.
डॉक्टर काय म्हणतातकनिकावर उपचार सुरु असलेल्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युुएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे डायरेक्टर आर. के. धीमन यांचे मानाल तर अनेकदा कोरोना व्हायरस वेगवेगळ्या पद्धतीने रिअॅक्ट करतो. अनेकदा व्यक्तीमध्ये बाहेरून कुठलेही लक्षणे दिसत नाही. अशास्थितीत केवळ चाचणीच्या अहवालावरच विश्वास ठेवता येऊ शकतो़.