Join us

CoronaVirus: लॉकडाउनमुळे किंशुक वैद्य असा साजरा करणार बर्थडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 07:00 IST

किंशुक लॉकडाउनमध्ये अशापद्धतीने साजरा करणार आहे वाढदिवस 

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातला असून भारतातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे देशात 21 दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सामान्यांसोबत सेलिब्रेटीदेखील घरात थांबले आहेत. त्यात काहींना स्पेशल क्षणदेखील घरातच थांबून साजरे करावे लागत आहेत. तसाच छोट्या पडद्यावरील अभिनेता किंशुक वैद्यचा आज म्हणजेच 5 एप्रिलला वाढदिवस आहे.

किंशुक येत्या रविवारी आपला वाढदिवस शांततेत साजरा करणार आहे. याबद्दल किंशुकने सांगितले की “सामाजिक अंतराच्या प्रकाशात, माझ्यासाठी यावर्षी वाढदिवस शांत क्षण ठरला आहे. त्यामुळे, मी माझा वाढदिवस माझ्या आई-वडील व आजीसमवेत साजरा करणार आहे. मला खात्री आहे की माझी मित्र मंडळी व्हिडिओ कॉलद्वारे माझ्यासाठी काहीतरी विशेष योजना आखत आहेत.

 किंशुकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने मालिकेतून बालकलाकार म्हणून काम केले आहे. शाकालाका बूमबूम या मालिकेतील संजूच्या भूमिकेतून तो घराघरात पोहचला होता. त्यानंतर आता त्याने बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

सध्या तो स्टार भारतवरील अत्यंत नावाजलेला शो 'राधाकृष्ण' मध्ये 'अर्जुन'ची भूमिका साकारताना दिसणार आहे.

टॅग्स :राधा कृष्ण