Join us

दीपिकाच्या या बॅगची किंमत वाचून व्हाल थक्क, इतक्यात होईल यूरोपची वारी! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 14:23 IST

आपल्या स्टाइल स्टेटमेंटमुळे दीपिका सतत चर्चेत असते. दीपिका नुकतीच आपल्या फेव्हरेट बॅगसह मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली.

मुंबई : दीपिका पादुकोनने सध्या काही दिवसांसाठी सिनेमांपासून ब्रेक घेतला आहे. पण मीडियात तिच्या चर्चा सतत सुरु आहेत. आपल्या स्टाइल स्टेटमेंटमुळे दीपिका सतत चर्चेत असते. दीपिका नुकतीच आपल्या फेव्हरेट बॅगसह मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली.

कलाकार मंडळी ही भरमसाठ पैसा कमवत असल्याने त्यांच्या वस्तूही अर्थातच महागड्या असणार. पण त्यांची किंमत जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये असते. 

सध्या दीपिकाच्या एका खास बॅगची चर्चा रंगली आहे. कारण दीपिकाच्या या बॅगची किंमत तुम्हाला धक्का देऊ शकते. शनेल ब्रॅंडच्या Deauville tote बॅगची किंमत इतकी आहे की, तुम्ही सहज यूरोपची ड्रिम ट्रिप प्लॅन करु शकती. या किंमत 2.9 लाख रुपये इतकी आहे. 

याआधीही दीपिकाच्या ड्रेसच्या आणि जॅकेटच्या किंमतीची जोरदार चर्चा झाली होती. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिकाच्या फंटी टॉपची किंमत 23 हजार 240 रुपये इतकी आहे. तर तिच्या जॅकेटची किंमत 91, 498 रुपये इतकी आहे. 

सध्या दीपिका आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाच्या चर्चा जोरदार रंगल्या आहेत. दोघेही लग्नाच्या तयारीला लागले असल्याचे सांगितले जात आहे. पण याबाबत दोघांकडूनही काहीही अधिकृत सांगण्यात आलेलं नाहीये.

टॅग्स :दीपिका पादुकोणबॉलिवूड