Join us

कोर्ट चित्रपटातील अभिनेते वीरा साथीदार यांचे कोरोनाने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 11:09 AM

वीरा साथीदार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. नागपूर येथील एम्स रुग्णालयात पाच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

ठळक मुद्देवीरा साथीदार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. नागपूर येथील एम्स रुग्णालयात पाच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि अभिनेते वीरा साथीदार यांचे आज कोरोनाने निधन झाले. त्यांनी कोर्ट या प्रसिद्ध मराठी चित्रपटात नारायण कांबळे ही भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. कोर्ट या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 

वीरा साथीदार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. नागपूर येथील एम्स रुग्णालयात पाच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

मूळ वर्धा जिल्ह्यातील असलेले वीरा साथीदार हे नागपूरच्या जोगीनगर झोपडपट्टीत लहानाचे मोठे झाले. वडील हमालीचे तर आई बांधकाम मजूर म्हणून काम करत होती. पण त्यांनी त्या परिस्थितीत देखील शिक्षण पूर्ण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. ते अभिनेते असण्यासोबतच गीतकार, पत्रकार होते. ते विद्रोही या मासिकाचे संपादक होते. ‘रिपब्लिकन पँथर’ संघटनेच्या माध्यमातून ते वंचितांसाठी काम करत होते.

चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाला ‘सुवर्णकमळा’चा सर्वोच्च बहुमान मिळाला होता. न्याय व्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटाचे देशविदेशातील अनेक महोत्सवांत कौतुक झाले होते. या चित्रपटात त्यांनी चळवळीतील एका बंडखोर कार्यकर्त्याची भूमिका बजावली होती. 

टॅग्स :वीरा साथीदार