Miss World 2024: मिस वर्ल्ड 2024 चं तब्बल २८ वर्षांनंतर भारतात आयोजन करण्यात आलं होतं. चेक रिपब्लिकच्या क्रिस्टीना पिस्कोवा 'मिस वर्ल्ड' ठरली. यासोबत लेबनानची यास्मीन जेटून पहिली रनर अप ठरली. भारताची सिनी शेट्टी (Sini Shetty) टॉप 4 च्या शर्यतीतून बाहेर पडली. काल 9 मार्च 2024 रोजी मिस वर्ल्ड ग्रँड फिनालेचं आयोजन मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर येथे करण्यात आलं होतं.
सिनी शेट्टीला अश्रू अनावर
मिस इंडिया 2024 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी सिनी शेट्टी टॉप 8 पर्यंत पोहोचू शकली. यानंतर टॉप 4 च्या शर्यतीतून ती बाहेर पडली. मिस वर्ल्ड स्पर्धा संपल्यानंतर तिचा अश्रू अनावर झाल्याचं एका व्हिडिओमध्ये दिसत आहे. बाहेरर आल्यानंतर सिनीने सर्वांची भेट घेतली. यावेळी तिला अश्रू अनावर झाले. तरी तिने चेहऱ्यावरील हास्य कायम ठेवलं. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
कोण आहे सिनी शेट्टी?
सिनी शेट्टीचा जन्म मुंबईत झाला आहे. २०२२ ची ती मिस इंडिया विजेती आहे. देशाला तिचा अभिमान आहे. सिनीने फायनान्समध्ये पदवी घेतली आहे. तसंच ती CFAचार्टेड फायनॅन्शियल एनलिस्टचं शिक्षण घेत आहे. सोबतच तिने मिस वर्ल्ड 2024 ची तयारी केली. वयाच्या चौथ्या वर्षापासून ती भरतनाट्यम शिकत आहे. कमी वयातच तिने कमवायला सुरुवात केली. ती अभिनेत्री, मॉडेल, प्रोडक्ट एक्झिक्युटिव्ह आणि कंटेंट क्रिएटर आहे.