Join us

दबंग मुक्ताचा रावडी अंदाज

By admin | Published: June 23, 2016 3:18 AM

मुंबई-पुणे-मुंबईमधील चुलबुली मुक्ता असो किंवा ‘जोगवा’मधील एकदमच वेगळ्या रूपात समोर आलेली मुक्ता असो

मुक्ता बर्वे हे नाव ऐकताच एक व्हर्सटाइल अ‍ॅक्ट्रेस डोळ््यांसमोर येते. मुंबई-पुणे-मुंबईमधील चुलबुली मुक्ता असो किंवा ‘जोगवा’मधील एकदमच वेगळ््या रूपात समोर आलेली मुक्ता असो, तिच्या दर्जेदार अभिनयावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात एवढे मात्र नक्की. कोणत्याही प्रकारचा रोल अगदी सहजरीत्या, सशक्तपणे साकारणारी ही मराठीतील दबंग गर्ल आता ‘गणवेश’ या सिनेमात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करताना एकदम हटके रावडी अ‍ॅक्शन सीन्समध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने सीएनएक्सशी मुक्ताने साधलेला हा संवाद..... ४बॉलीवूडमध्ये जाण्याची तुझी इच्छा आहे का?हो, नक्कीच मी एखाद्या बॉलीवूड चित्रपटात दिसू शकेन, परंतु त्यासाठी चांगल्या कथेची गरज आहे. एखादा ताकदीचा रोल आल्याशिवाय मी हिंदी चित्रपट करणार नाही. मराठीमध्ये चांगला कंटेन्ट आहे, वेगळ््या विषयांचे सिनेमे येत आहेत अन् त्या माध्यामातून आज आम्ही जगभर पोहोचतोय. त्यामुळे उगाचच हिंदीमध्ये कोणताही रोल करण्यापेक्षा चांगल्या भूमिकेची मी वाट पाहीन.४‘गणवेश’मध्ये तू वेगळ््या प्रकारचा रोल करीत आहेस. हा चित्रपट स्वीकारण्यामागील तुझी भूमिका काय ?जसे तुम्ही म्हणालात, की मी या चित्रपटात वेगळा रोल करीत आहे. तेच मुख्य कारण आहे, मी हा चित्रपट स्वीकारण्यामागील. जेव्हा मी या चित्रपटाची कथा वाचली तेव्हाच मला माझी भूमिका फार आवडली. या सिनेमाचा कंटेन्ट खूप छान आहे. एक वेगळ््या प्रकारची भूमिका मला यामध्ये साकारण्याची संधी मिळाल्याने मी हॅपी आहे. ४या चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?या चित्रपटात मी एका महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करीत आहे. परंतु ती व्यक्तिरेखा पाहताना तुम्हाला कुठेच फेक असे काही दिसणार नाही. पडद्यावर ती पोलीस अधिकारी पाहताना प्रेक्षकांना ह्युमन लेव्हलला जाऊन पाहताना खरा पोलीसच दिसेल, एवढी परफेक्ट भूमिका करण्याचा मी प्रयत्न केला आहे. ४पोलीस अधिकाऱ्याची भूमिका जिवंत करण्यासाठी काही पोलीस अधिकारी महिलांना भेटलीस का? हो, मी अन् माझा डिरेक्टर अतुल जगदाळे आम्ही या रोलचा अभ्यास करण्यासाठी अनेक पोलीस अधिकारी महिलांना भेटलो होतो. मला शूटिंग सुरू होण्यापूर्वीच एक स्टडी म्हणून अतुल वेगवेगळ््या पोलीस चौकीतील महिला पोलिसांना भेटवत असे. त्या महिलांच्या काही अडचणी आहेत का, त्यांचे प्रॉब्लेम्स त्या कशाप्रकारे हॅन्डेल करतात, या गोष्टी आम्ही त्यांच्याशी बोललो. त्यांच्यावर काही सरकारी नियमांची बंधने असतात का, हे जाणून घेतले. एवढेच नाही तर त्यांचे वैयक्तिक आयुष्य अन् काम यांची त्या कशी सांगड घालतात, हे सर्व जेव्हा आम्ही जवळून पाहिले, तेव्हा ही भूमिका करणे माझ्यासाठी सोपे गेले.४तू पहिल्यांदाच या चित्रपटात अ‍ॅक्शन सीन्स करताना दिसणार आहेस, यासाठी काही खास प्रशिक्षण घेतले होतेस का?हो, मी पहिल्यादांच आॅन स्क्रीन अ‍ॅक्शन सीन्स करताना प्रेक्षकांना दिसणार आहे. परंतु यासाठी मी काही खास प्रशिक्षण वगैरे घेतलेले नाही. डायरेक्ट शूटिंगच्या ठिकाणी गेल्यावरच आम्ही सीन्स सुरू करायचो. यामध्ये बऱ्याच जणांना मी मारताना दिसणार आहे. बरीच पळापळ अन्पाठलाग करताना मला जोरदार धावावे लागले आहे. गन चालवावी लागली आहे. या सर्व गोष्टी करताना मजा आली. ४सेन्सॉर बोर्डाविषयी सध्या खूप चर्चा सुरू आहे, सेन्सॉरशिपबद्दल तू काय सांगशील? सेन्सॉर बोर्ड नक्की काय सेन्सॉर करीत आहे हे महत्त्वाचे आहे. नियम काय अन् कोणते आहेत, हा खरा मुद्दा आहे. प्रत्येकालाच व्यक्त होण्याचा हक्क आहे. आजची जनरेशन इंटरनेट अन् यू-ट्युबवर त्यांना हव्या त्या गोष्टी पाहू शकतात. म्हणून जर चित्रपटांसाठी काही कॅटेगरीज केल्या, तर प्रेक्षक त्यांना हवे ते सिनेमे पाहू शकतील.