बॉलिवूडचा ‘दबंग खान’ म्हणून ओळखला जाणारा सलमान खानचा ‘दबंग 3’ हा सिनेमा आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भाईजानने जीवतोड मेहनत केली. साहजिकच रिलीजपूर्वी चित्रपटाची चर्चा झाली. पण रिलीजनंतर भाईजानच्या चाहत्यांची पुरती निराशा झालेली दिसतेय. होय, सोशल मीडियावरच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया बघता सलमानचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला नसल्याचे स्पष्ट दिसतेय.‘दबंग 3’ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. एकीकडे सलमानच्या डायहार्ट फॅन्सला हा सिनेमा नेहमीप्रमाणे आवडला. पण काही युजर्सनी मात्र ‘दबंग 3’वर नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, नाराजी व्यक्त करणा-यांमध्ये सलमानचे काही चाहतेही आहेत.
‘चित्रपटाचा फर्स्ट हाफ टॉर्चरने भरलेला आहे. सोनाक्षी व सलमानचे टॉर्चर पाहून माझे सोबती चित्रपट अर्धवट सोडून निघून गेले. माझी पत्नीही नाराज झाली,’ असे या युजरने लिहिले. अर्थात काहींना हा सिनेमा आवडला. अशात भाईजानचा ‘दबंग 3’ किती कमाई करतो, ते बघूच.