Join us

सुदीपची पत्नी आहे ही प्रसिद्ध निर्माती, काही कारणांमुळे त्यांच्यात निर्माण झाला होता दुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 13:25 IST

दबंग 3 या चित्रपटात सुदीप खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. सुदीपने या आधी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले असून त्याने एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत.

ठळक मुद्देसुदीपचे लग्न प्रिया सुदीपसोबत झाले होते. प्रियादेखील चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे. तिने काही चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे.

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ म्हणून ओळखला जाणारा सलमान खानचा ‘दबंग 3’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भाईजानने जीवतोड मेहनत घेतली होती. साहजिकच रिलीजपूर्वी चित्रपटाची चर्चा झाली. पण रिलीजनंतर भाईजानच्या चाहत्यांची पुरती निराशा झालेली दिसतेय. होय, सोशल मीडियावरच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया बघता सलमानचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला नसल्याचे स्पष्ट दिसतेय.

दबंग 3 या चित्रपटात सुदीप खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. सुदीपने या आधी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले असून त्याने एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. सुदीपने नुकतेच सुनील शेट्टीसोबत पहलवान या चित्रपटात देखील काम केले होते. सुदीप गेल्या वर्षी त्याच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आला होता. 

सुदीपचे लग्न प्रिया सुदीपसोबत झाले होते. प्रियादेखील चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे. तिने काही चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. पण 14 वर्षांच्या संसारानंतर त्यांच्यात सतत भांडणं होत असल्याने त्यांनी वेगळे व्हायचे ठरवले. हा काळ त्याच्यासाठी खूप कठीण होता असे त्यानेच एका मुलाखतीत सांगितले होते. त्याने म्हटले होते की, माझ्याकडे त्यावेळात प्रचंड काम होते तर दुसरीकडे माझ्या खाजगी आयुष्यात अनेक प्रॉब्लेम सुरू होते. या सगळ्यातून कशाप्रकारे मार्ग काढायचा हेच मला कळत नव्हते. 

सुदीप आणि प्रिया यांना एक मुलगी असून ते दोघे वेगळे झाल्यानंतर काही काळ त्यांची मुलगी प्रियासोबतच राहात होती. पण काही महिन्यानंतर त्या दोघांनी पुन्हा एकत्र यायचे ठरवले. आता सुदीप, प्रिया आणि त्यांची मुलगी एकत्र राहात असून त्यांच्या आयुष्यात ते प्रचंड खूश आहेत. 

टॅग्स :दबंग 3