Dadasaheb Phalke Award 2023 : 'द काश्मीर फाईल्स' ठरली बेस्ट फिल्म, अनुपम खेर यांनाही मिळाला पुरस्कार; वाचा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 11:37 AM2023-02-21T11:37:24+5:302023-02-21T11:40:26+5:30

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे काल २० फेब्रुवारी रोजी मुंबईत आयोजन करण्यात आले होते.

Dadasaheb Phalke Award 2023 'The Kashmir Files' got Best Film award Amupam Kher gets Most Versatile actor award | Dadasaheb Phalke Award 2023 : 'द काश्मीर फाईल्स' ठरली बेस्ट फिल्म, अनुपम खेर यांनाही मिळाला पुरस्कार; वाचा संपूर्ण यादी

Dadasaheb Phalke Award 2023 : 'द काश्मीर फाईल्स' ठरली बेस्ट फिल्म, अनुपम खेर यांनाही मिळाला पुरस्कार; वाचा संपूर्ण यादी

googlenewsNext

Dadasaheb Phalke Award 2023 : दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे काल २० फेब्रुवारी रोजी मुंबईत आयोजन करण्यात आले होते.  या महोत्सवात सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. सिनेमा क्षेत्रातील अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कारावर 'द काश्मीर फाईल्स' सिनेमाने मोहोर उमटवली आहे. विवेक अग्निहोत्रींच्या काश्मीर फाईल्सला 'बेस्ट फिल्म'चा पुरस्कार मिळाला आहे. 

30 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची कहाणी सिनेमात दाखवली आहे. यामध्ये अनेक काश्मीरी पंडितांची आतंकवाद्यांनी हत्या केली. अंगावर शहारे आणणारे असे अनेक सीन्स या सिनेमात चित्रीत करण्यात आले आहेत. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सिनेमा दिग्दर्शित केला असून त्यांनीच निर्मितीही केली आहे. या सिनेमावरुन मोठा वादही झाला. काही राजकीय लोकांनी सिनेमा प्रोपगांडा असल्याचे म्हणले. मात्र सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवले. चित्रपटाला अनेक पुरस्कारही पटकावले. नुकत्याच पार पडलेल्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय महोत्सवात काश्मीर फाईल्सने बाजी मारत 'बेस्ट फिल्म' चा पुरस्कार मिळवला. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पुरस्कार स्वीकारत म्हणाले, 'आयोजकांचे आभार. अनेक जणांनी एकत्र येत हा सिनेमा बनवला आहे. म्हणूनच हा लोकांचा सिनेमा आहे. मी हा पुरस्कार त्या सर्व पीडितांना प्रदान करतो.'

यावेळी अभिनेते अनुपम खेर देखील उपस्थित होते. अनुपम खेर यांना 'मोस्ट व्हर्सेटाइल अॅक्टर' म्हणून पुरस्कार मिळाला. सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले.यावेळी ते म्हणाले, 'हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आभार मानतो.तुम्ही कुठेही असलात तरी स्वप्न पाहणं खूप महत्वाचं आहे. कारण हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही मेहनत करता आणि माझ्यामते ते स्वप्नं एक ना एक दिवस पूर्णही होतात.'

Dadasaheb Phalke Award 2023 : 'गंगूबाई' सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर 'ब्रम्हास्त्र'साठी रणबीरला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

दादासाहेब फाळके आंततराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३ मध्ये प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारांची यादी :

RRR- फिल्म ऑफ द ईयर
द कश्मीर फाइल्स– बेस्ट फिल्म
आलिया भट्ट– बेस्ट एक्ट्रेस (गंगूबाई काठियावाड़ी)
रणबीर कपूर- बेस्ट एक्टर (ब्रह्मास्त्र पार्ट 1)
वरुण धवन- बेस्ट एक्टर क्रिटिक्स (भेड़िया)
ऋषभ शेट्टी – बेस्ट प्रॉमेसिंग एक्टर (कांतारा)
अनुपम खेर – मोस्ट वर्सेटाइल एक्टर (द कश्मीर फाइल्स)
रुद्र: द एज ऑफ ... डार्कनेस – बेस्ट वेब सीरीज 
अनुपमा – टीवी सीरीज ऑफ द इयर
तेजस्वी प्रकाश – बेस्ट टीवी एक्ट्रेस (नागिन 6)
जैन इमाम– बेस्ट टीवी एक्टर (फना-इश्क में मरजावा)

Web Title: Dadasaheb Phalke Award 2023 'The Kashmir Files' got Best Film award Amupam Kher gets Most Versatile actor award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.