दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे काल २० फेब्रुवारी रोजी मुंबईत आयोजन करण्यात आले होते. मनोरंजनविश्वातील अनेक तारे सोहळ्याला उपस्थित होते. शाहरुख खान, विकी कौशल ते बॉबी देओल या कलाकारांनी पुरस्कारावर नाव कोरले. शाहरुखच्या 'जवान' सिनेमाचा सोहळ्यात बोलबाला पाहायला मिळाला.
मुंबईच्या ताज लँड्स एंडमध्ये दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल पार पडले. यावेळी साऊथ दिग्दर्शक अॅटली आपल्या पत्नीसह आला होता. तर साऊथ ब्युटी नयनताराही सामील झाली होती. पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अनेक सेलिब्रिटी अवतरले. शाहरुख खानने यावेळी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. तसंच राणी मुखर्जीसोबत पोज देत त्याने लाईमलाईट घेतलं. यावर्षी शाहरुख खानला 'जवान' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर नयनताराला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आले. विजेत्यांची संपूर्ण यादी वाचा
सर्वोत्कृष्ट अभिनेता - शाहरुख खान
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - नयनतारा
सर्वोत्कृष्ट खलनायक - बॉबी देओल (अॅनिमल)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - संदीप रेड्डी वांगा (अॅनिमल)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) - विकी कौशल (सॅम बहादुर)
२०२३ हे वर्ष शाहरुखसाठी खूपच खास होतं. त्याच्या बॅक टू बॅक तीन सिनेमांनी बॉक्सऑफिसवर धुरळा उडवला. 'जवान','पठाण' आणि 'डंकी' ची वर्षभर चर्चा राहिली. तर दुसरीकडे वर्षाच्या शेवटी रणबीर कपूरच्या Animal सिनेमाची जोरदार चर्चा झाली. यामधील बॉबी देओलने त्याच्या परफॉर्मन्सने सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं. दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार सोहळा पाहायचा असल्यास झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.