दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली आहेत. ही मालिका महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजनची निर्मिती आहे. या मालिकेने नुकताच १०० भागांचा टप्पा गाठला. या खास दिवसाचं सेलिब्रेशन अनोख्या पद्धतीने करण्यात आलं. कोल्हापूरमधील चेतना अपंगमती विकास संस्थेतील विकलांग मुलांसोबत मालिकेच्या टीमने १०० भागांच्या पूर्ततेचा आनंद साजरा केला. चेतना अपंगमती विकास संस्था गेली अनेक वर्ष बौद्धिक अक्षम मुलांचं संगोपन करुन त्यांना स्वत:च्या पायावर उभे रहाण्याचे धडे देत आहे. या मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याच्या हेतूने ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेच्या टीमने या मुलांसोबत सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं. या खास प्रसंगी निर्माते महेश कोठारे आणि मालिकेतील प्रमुख कलाकार उपस्थित होते.
या मालिकेत विशाल निकम ज्योतिबांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी विशालने 20 दिवसांत 12 किलो वजन वाढवले होते. विशाल हा स्वत: जिम ट्रेनर असून नुकताच अभिनयाकडे वळला आहे. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातूनही वेळ काढून तो वर्कआऊट करतो. याआधी ‘साता जन्माच्या गाठी’या मालिकेत तर 'मिथुन्' आणि 'धुमस' या सिनेमात भूमिका साकारल्या होत्या.