Join us

नवऱ्याविरोधात दलजीत कौर पोलिसांत, दाखल केला FIR, बर्थडेच्या दिवशीच Ex पतीला दिलं मोठं गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 13:40 IST

लग्नानंतर केन्याला गेलेली दलजित संसार मोडत पुन्हा भारतात परतली होती. आता दलजितने थेट नवऱ्याविरोधात FIR दाखल केला आहे.

टीव्ही अभिनेत्री दलजित कौर गेल्या कित्येक दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. दलजितने काही महिन्यांपूर्वीच निखिल पटेलशी लग्न करत नव्याने संसार थाटला होता. पण, अवघ्या १० महिन्यांतच दलजितचा संसार मोडल्याने तिच्या वैवाहिक आयुष्यात पुन्हा वादळ आलं आहे. दलजीतने तिच्या दुसऱ्या पतीवर अनेक गंभीर आरोप केले होते. लग्नानंतर केन्याला गेलेली दलजित संसार मोडत पुन्हा भारतात परतली होती. आता दलजितने थेट नवऱ्याविरोधात FIR दाखल केला आहे. 

दलजितचा पती निखिल पटेल काही दिवसांपूर्वीच भारतात आला आहे. गर्लफ्रेंडबरोबर त्याला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं होतं. २ ऑगस्टला निखिलचा वाढदिवस होता. त्यामुळे तो गर्लफ्रेंडबरोबर भारतात आला होता. बर्थडेच्या दिवशीच दलजितने निखिलविरोधात FIR दाखल करत त्याला मोठं गिफ्ट दिलं आहे. टाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, दलजितने आग्रीपाडा पोलिसात IPC कलम ८५ आणि ३१६(२)च्या अंतर्गत FIR दाखल केला आहे. क्रुरता आणि विश्वासघात केल्याचा आरोप दलजितने निखिलवर केला आहे. तिने निखिलवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपही केला होता. 

निखिलच्या वाढदिवशी दलजितने एक पोस्टही तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केली होती. पण, नंतर ही पोस्ट तिने डिलीट केली. आता FIR दाखल केल्याची पोस्ट करत दलजितने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. दलजित आणि निखिलने मार्च 2023 मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण, लग्नानंतर १० महिन्यातंच त्यांचा संसार मोडला आहे. दलजीतने घटस्फोटासाठीही अर्ज केला आहे. 

टॅग्स :दलजीत कौरटिव्ही कलाकार