Join us

दलजीत कौरच्या दुसऱ्या पतीने आरोपांवर दिलं उत्तर; म्हणाला, "तिने पहिल्या पतीसोबत केलं तेच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 13:39 IST

निखिल पटेलने ऑफिशियल स्टेटमेंट जारी केलं आहे. तो म्हणतो...

टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर (Dalljiet Kaur) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. निखिल पटेलसोबत दुसरं लग्न केल्यावर ती केनियाला शिफ्ट झाली होती. मात्र तिथून ती १० महिन्यातच परत आली. काही दिवसांनी तिने निखिलावर विवाहबाह्य संबंधांचे आरोप लावले. नुकतंच निखिल त्याच्या गर्लफ्रेंडसोबत मुंबईत आला होता. तेव्हा दलजीतने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. आता नुकतंच निखिलने आरोपांवर उत्तर दिलं आहे.

निखिल पटेलने ऑफिशियल स्टेटमेंट जारी केलं आहे. तो म्हणतो, "माझी आणि दलजीतची भेट २०२२ मध्ये दुबईत झाली होती. त्यानंतर 2023 मध्ये आम्ही भारतात येऊन लग्न केलं. लग्नानंतर आम्ही नॉर्वेला गेलो. मी तिथे काम करतो. आम्ही जानेवारी 2024 पर्यंत केनियात कुटुंबाप्रमाणेच राहत होतो. नंतर ती जेडनला घेऊन भारतात आली."

तो पुढे लिहितो,'दलजीतला केनियाला शिफ्ट व्हायचे होते आणि माझ्यासोबत आणि माझ्या मुलींसोबत तिला आयुष्य जगायचं होतं. तिला माहित होतं की तेव्हा माझा पहिल्या पत्नीसोबत कायदेशीर घटस्फोट झालेला नव्हता. माझ्या लीगल टीमने दलजीतच्या पालकांना लेटर पाठवलं ज्यात हे सगळं नमूद केलं होतं. ते या लग्नासाठी तयार झाले. म्हणूनच हिंदू पद्धतीने लग्न पार पाडलं. कायदेशीर पद्धतीने लग्न झालं नव्हतं. दलजीत केनियाला जाऊ शकेल यासाठी हा विधी होता. यावर्षी जानेवरीपर्यंत माझा घटस्फोट झाला नव्हता. तोपर्यंत दलजीतने केनिया सोडलं होतं. 

"दलजीतला आधीपासूनच माहित होतं की ती एका विवाहित पुरुषासोबत नातं जोडत आहे. तिला आधीच माहित होतं की मी विवाहित आहे तरी ती आता माझ्यावर चीटरचा टॅग लावत आहे. ती आता दावा करत आहे की माझं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरु आहे. २ ऑगस्टला माझा वाढदिवस होता आणि दलजीतने माझ्याविरोधात FIR दाखल केला. ती माझ्यासोबत तेच करत आहे जे तिने पहिल्या पतीसोबत केले होते. तिने FIR मध्ये खोटे आरोप केले आहेत."

टॅग्स :दलजीत कौरटिव्ही कलाकारपोलिसघटस्फोटलग्न