Join us

'भिंतीवरचं पेंटिंग मिटवशील पण सत्य...?', दलजीत कौरने पुन्हा पतीवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 16:50 IST

दलजीत कौरचा पतीसोबतचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

'इस प्यार को क्या नाम दूँ' मालिकेत अंजली या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री दलजीत कौर (Dalljiet Kaur) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पहिला पती शालीन भनोतशी घटस्फोट झाल्यानंतर तिने केनियाच्या निखिल पटेलसोबत लग्नगाठ बांधली. अगदी धामधूम पद्धतीने त्यांनी लग्न केले. नंतर दलजीत तिच्या मुलासह(शालीन भनोतचा मुलगा) केनियाला शिफ्ट झाली. मात्र तिकडे गेल्यावर वेगळंच घडलं. निखिल पटेलचे विवाहबाह्य संबंध असल्याचं तिच्या लक्षात आलं आणि ती १० महिन्यातच लेकाला घेऊन भारतात परतली. बऱ्याच महिन्यांनी तिने सोशल मीडियावर या प्रकरणाला वाचा फोडली. 

दलजीतने नुकतंच निखिल पटेलच्या केनियातील घरातील एका वॉल पेंटिंगची स्टोरी पोस्ट केली आहे. यात तिने लिहिले, 'भितीवरील चित्र मिटवू शकतो. पण सत्य कसं मिटवशील? दुर्दैवाने सत्य हे इतकं छोटं नाही.' याशिवाय दलजीतने निखिलची एक स्टोरी रिपोस्ट करत लिहिले SN असे लिहिले. SN हे निखिलच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे. दलजीतने अनेकदा हे नाव स्टोरीमध्ये ठेवत पतीच्या विवाहबाह्य संबंधांवर बोट ठेवलं आहे.

दुसरीकडे निखिल पटेलने दलजीतविरोधात कायदेशीर कारवाई केली आहे. दलजीत सोशल मीडियावर त्याच्याबद्दल जे बोलत आहे यावर त्याने आक्षेप घेतला आहे. तसंच दलजीतला त्याने आपलं सामानही घेऊन जाण्यास सांगितलं आहे. अन्यथा ते दान करण्यात येईल असा इशारा त्याने दिला आहे.

2009 साली दलजीतने शालीन भनोतशी लग्न केले होते. त्यांना एक मुलगाही झाला. २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. अभिनेत्रीने शालीनवर घरगुती हिंसाचाराच आरोप लावला होता. यानंतर २०२३ मध्ये दलजीतने निखिल पटेलशी लग्न केले. निखिलचाही आधी घटस्फोट झाला असून त्याला दोन मुली आहेत.

टॅग्स :दलजीत कौरटिव्ही कलाकारलग्नघटस्फोटसोशल मीडिया