तुमच्या अंगी कला असेल तर यश, पैसा आणि प्रसिद्धी नक्की मिळते.टॅलेंटमुळे कुणाचंही नशीब क्षणात पालटू शकतं हे झगमगत्या दुनियेत पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हेच घडलं आहे. 'डान्स दीवाने' शोची स्पर्धक अरुंधतीबरोबर.मुळात 'डान्स दीवाने' हा असा मंच आहे, जो सर्व वयोगटाच्या आणि सामाजिक-आर्थिक स्तरातील सर्व पिढीतील पॅशनेट डान्सरला प्रोत्साहन देतो व आमंत्रित करतो. ऱॉकिंग सुरूवात केल्यानंतर, शोने देशाच्या कानाकोप-यात जाऊन आता 16 स्पर्धक शोधून काढले आहेत. जे डान्स फ्लोअरवर आपली अदाकारी दाखवणार आहेत. या शोने अनेक टॅलेंटेड डान्सरना पुढे आणले आहे, तसेच हेच स्पर्धक सा-यांसाठी प्रेरणादायीही ठरत आहेत.
अशीच एक गोष्ट आहे ओरिसाच्या अरुंधती गारनाईकची, ती 23 वर्षांची असून तिने सिध्द केले आहे की तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर कठोर परिश्रमाला पर्याय नाही. अरुंधतीने खूप लहान वयात डान्स करायला सुरूवात केली आणि त्यामुळे प्रसिद्ध कोरिओग्राफरकडून प्रशिक्षण घेतले, नशिबात काही औरच होते. त्याचदरम्यान तिचा अपघात झाला त्यात तिच्या मणक्याला जबर दुखापत झाली. या कालावधीत उपचासार सुरु असतानाच अरुंधतीने हार मानली नाही. तिचे प्रयत्न सुरुच ठेवले. डान्ससाठी तिची पॅशन जोपासण्यासाठी मंचावर येण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्याच मेहनतीच्या जोरावर ती आज हा मंच गाजवत आहे.