आयफोन वापरणाऱ्या गौतमी पाटीलचं शिक्षण किती माहितीये का?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 02:22 PM2023-05-24T14:22:16+5:302023-05-24T14:22:59+5:30
Gautami patil: अलिकडेच गौतमीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या शिक्षणाविषयी भाष्य केलं.
'पाटलांचा बैल गाडा', 'सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम' अशा कितीतरी गाण्यांसाठी ओळखली जाणारी लावणी डान्सर म्हणजे गौतमी पाटील (gautami patil). आपल्या बहारदार नृत्यामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या गौतमीचं आयुष्य बऱ्यापैकी वादग्रस्त राहिलं आहे. त्यामुळे गेल्या काही काळात सोशल मीडियावर तिची मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे. यामध्येच सध्या तिच्या शिक्षणाची चर्चा रंगली आहे.
एका गाण्यासाठी तगडं मानधन घेणारी गौतमी मध्यंतरी तिच्या लग्नामुळे चर्चेत आली होती. तिला नेमका कसा जोडीदार हवा हे तिने सांगितलं होतं. त्यानंतर आता तिच्या शिक्षणाची चर्चा होऊ लागली आहे. अलिकडेच गौतमीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या शिक्षणाविषयी भाष्य केलं.
गौतमी मुळची धुळ्याची असून ती २७ वर्षांची आहे. आयुष्यात गौतमीने बराच स्ट्रगल केला आहे. तिच्या आईने एकटीने गौतमीचा सांभाळ केला. घरची परिस्थिती बेताची असतानाही गौतमीने त्यावर मात करत आज तिचं नाव महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं आहे.
गौतमीने धुळ्यातील सिंदखेडा या ठिकाणी तिचं दहावीचं शिक्षण घेतलं. त्यापुढे तिने घरची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे गौतमीचं शिक्षण केवळ दहावीपर्यंतच झालं आहे. परंतु, आज तिच्या नृत्यशैलीमुळे तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. गौतमी एका गाण्यासाठी एक ते दीड लाख रुपये मानधन घेते. इतकंच नाही तर ती आयफोनसारखा महागडा फोन वापरत असून लक्झरी लाइफस्टाइल जगते. दरम्यान,गेली नऊ ते दहा वर्षापासून गौतमी या क्षेत्रामध्ये काम करत असून तिने नृत्याचं कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नाही. गौतमी लवकरच घुंगरु या मराठी सिनेमात झळकणार आहे.