Join us

नकाब घालून जेवण करणाऱ्या महिलेला 'दंगल गर्ल' चा पाठिंबा, म्हणाली, " हे आम्ही तुमच्यासाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 13:11 IST

मी सुद्धा नुकतंच लग्नात नकाब घालूनच जेवले, झायरा वसीमचं ट्वीट चर्चेत

'दंगल गर्ल' म्हणून लोकप्रिय झालेली अभिनेत्री झायरा वसीमने (Zaira Wasim) फिल्म इंडस्ट्री सोडून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. इस्लामसाठी तिने अभिनय क्षेत्राला कायमचा रामराम केला. झायरा तिच्या ट्वीटमुळे अनेकदा चर्चेत असते. इस्लामबद्दल ती खुलेआम तिचं मत मांडताना दिसते. नुकतंच तिने नकाब घालून जेवण करणाऱ्या एका मुलीला पाठिंबा दिला आहे. काय आहे नेमकं प्रकरण बघुया.

सोशल मीडियावर एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एक मुलगी नकाब न काढताच जेवण करत आहे. अझत अलसलीम या ट्वीटर हँडलरने हा फोटो पोस्ट करत लिहिले, "ही एका माणासाची चॉईस असू शकते का?" 

झायराने हे ट्वीट रिट्वीट करत लिहिले, "नुकतंच एका लग्नाला जाऊन आले. मी सुद्धा अशाच पद्धतीने जेवण केलं. तेही पूर्णपणे माझ्या चॉईसने. आजूबाजूचे लोक मला बघत होते आणि नकाब काढायलाही सांगत होते. पण मी काढला नाही. आम्ही हे तुमच्यासाठी करत नाही. तुम्हीही याला सामोरे जा."

झायराच्या या ट्वीटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तिचं कौतुक केलंय तर काहीं जणांनी तिच्यावर टीका केली आहे. 'तू इस्लामचा योग्य आदर करत आहेस, आमीन', 'ही तिची चॉईस आहे तिला योग्य वाटतंय तर तिला करु द्या' असं म्हणत झायराला पाठिंबा दिलाय. तर काही जणांनी मात्र विरोध केलाय. 'पक्ष्यांनाही नंतर पिंजरा प्रिय वाटतो' अशी खोचक कमेंट एकाने केली आहे.

टॅग्स :झायरा वसीमइस्लामट्विटरसोशल मीडिया