Join us

VIDEO : ...जेव्हा २०० किलो वजनाच्या किंग कॉंगला दारा सिंह यांनी उचलून रिंग बाहेर फेकलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 3:52 PM

१३० किलोच्या दारा सिंह यांनी किंग कॉंगला पटाखनी देत रिंग बाहेर फेकलं होतं. दारा सिंह यांचा दाव सर्वांना हैराण करून सोडणारा होता.

बॉलिवूडच दिवंगत कलाकार दारा सिंह यांची आज जयंती. त्यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९२८ ला झाला होता. दारा सिंह यांनी सिनेमातून आणि कुस्तीतून आपली ओळख निर्माण केली. ते इतके मजबूत पहेलवान होते की, त्यांच्यासमोर जगातले मोठमोठे पहेलवान टिकू शकले नाहीत. दारा सिंह यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या २०० किलो वजनाच्या किंग कॉंगसारख्या पहेलवानाला धूळ चारून इतिहास रचला होता.

किंग कॉंगला रिंग बाहेर फेकलं

१३० किलोच्या दारा सिंह यांनी किंग कॉंगला पटाखनी देत रिंग बाहेर फेकलं होतं. दारा सिंह यांचा दाव सर्वांना हैराण करून सोडणारा होता. दरम्यान दारा सिंह यांनी त्यांच्या करिअरमध्ये साधारण ५०० प्रोफेशनल कुस्ती लढल्या आणि सर्वच जिंकल्या. यात त्यांनी कॅनडाच्या George Gordienko, न्यूजीलॅंडच्या John Desilva सारख्या मोठ्या पहेलवानांना मात दिली होती.

दारा सिंह यांनी रूस्तम-ए-पंजाब आणि रूस्तम-ए-हिंद सारखे किताब जिंकले होते. १९६८ मध्ये दारा सिंह यांनी फ्रीस्टाइल कुस्ती लढली होती. त्यात त्यांनी अमेरिकेच्या लाउ थेजला हरवलं होतं आणि सोबतच ते वर्ल्ड चॅम्पियन ठरले होते. १९८३ मध्ये दारा सिंह यांनी कुस्ती करणं सोडलं. १९६६ मध्ये त्यांचं नाव रेसलिंग ऑब्जर्वर न्यूजलेटर हॉल ऑफ फेममध्ये सामिल करण्यात आलं. २००३ ते २००९ पर्यंत ते राज्य सभा सदस्यही होते.

दारा सिंह यांनी ५० च्या दशकात फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली होती. त्यांना किंग कॉंग आणि फौलादमधील भूमिकेंसाठी ओळखलं जातं. दारा सिंह यांनी १०० पेक्षा अधिक सिनेमात काम केलं. अभिनयात त्यांना सर्वात जास्त लोकप्रियता हनुमानाच्या भूमिकेने मिळाली होती.  

टॅग्स :दारा सिंगबॉलिवूड