अभिनेत्री आलिया भट(Alia Bhatt)च्या प्रोडक्शन हाऊसचा डेब्यू चित्रपट 'डार्लिंग्स'(Darlings)चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. हा चित्रपट ५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमध्ये आलिया भट एका दमदार स्टाईलमध्ये दिसत आहे. ट्रेलरमध्ये ती कौटुंबिक हिंसाचाराची शिकार होताना दिसत आहे, परंतु त्याच वेळी, ती तिच्या पतीच्या अत्याचारामुळे त्रस्त झाल्यानंतर बदला घेण्याच्या शैलीत देखील दिसत आहे. या चित्रपटात आलियाशिवाय शेफाली शाह, विजय वर्मा, रोशन मॅथ्यू आणि राजेश शर्मा हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
ट्रेलरच्या सुरुवातीला आलिया भटचा नवरा हमजा शेखची भूमिका साकारणारा अभिनेता विजय वर्मा ‘माझं माझ्या पत्नीवर खूप प्रेम आहे, पण मी तिला सोडून जात आहे’ असं म्हणताना दिसत आहे. त्यानंतर आलिया भट दिसत आहे. लाल पोशाखात आणि लाल लिपस्टिक लावलेली. ती तिच्या पतीची वाट पाहते आणि तिची प्रतीक्षा अपूर्ण राहते. यानंतर ती पतीची हरवल्याची तक्रार दाखल करते. ते पोलिस स्टेशनला फेऱ्या मारतात आणि नंतर ती वेगळ्या अंदाजात पाहायला मिळते. शेवटी पतीने तिला पकडले आणि ती त्याला ओलीस ठेवते. पुढच्याच क्षणी ती स्वतः कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडल्याचे दिसते. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की हमजा हा ड्रग्सचा व्यसनी आहे आणि तो आपल्या पत्नीला मारहाण करतो. पण, त्यानंतर आलियाने तिचा दृष्टिकोन बदलला. 'फिल्डिंग काफी है, अब बॅटिंग चालू है' असा त्यांचा डायलॉग ऐकायला मिळतो. यानंतर ती बदला घेताना दिसत आहे. मात्र, आलियाच्या पतीचे अपहरण कोणी केले, याचे रहस्य शेवटपर्यंत उघड झाले नाही.