'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) अशी मालिका आहे जी गेल्या १३ पेक्षा जास्त वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. यातील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या त्यांच्या रिअल लाईफबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असते. दयाबेन (Dayaben) म्हणजे दिशा वकानी (Disha Vakani) ची भूमिका मालिकेतील सर्वात लोकप्रिय भूमिका आहे. पण शोमधून ती काही वर्षापासून गायब आहे. पण तिची पॉप्युलॅरिटी आजही कायम आहे. आज तिच्या नेटवर्थबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
दिवाळी २०२१ पुन्हा एकदा आनंद घेऊन आली आहे. टीव्ही आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी लक्ष्मीची पूजा करून उत्सव साजरा केला. दिवाळीच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला 'तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)' ची दयाबेन उर्फ दिशा वकानीच्या संपत्तीबाबत सांगणार आहोत.
'तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)' तील दयाबेन गेल्या काही वर्षापासून मालिकेतून गायब आहे. पण तिच्या भूमिकेने आजही लोकांच्या मनात घर केलेलं आहे. तिचे डायलॉग आजही लोकांना पाठ आहेत.
दयाबेन ही कोट्यावधी रूपयांची मालक आहे. तिच्या एकूण संपत्तीबाबत वाचून तुम्हीही हैराण व्हाल. Bollywoodlife.com च्या वृत्तानुसार, दयाबेनला 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या एका एपिसोडसाठी दीड लाख रूपये मिळत होते. ज्यामुळे ती २०१७ मध्ये दर महिन्याला २० लाख रूपये कमाई करत होती.
दयाबेनकडे एकूण संपत्ती ३७ कोटी रूपये असल्याचं सांगितलं जातं. त्यासोबतच तिच्या एक बीएमडब्ल्यू कारही आहे. मालिकेच्या प्रेक्षकांमध्ये वाढत्या आपल्या लोकप्रियतेमुळे दयाबेनला अनेक जाहिराती मिळाल्या आणि अनेक ब्रॅन्डसोबतही तिने काम केल.
दिशा वकानीने ड्रॅमेटिक आर्ट्समधून शिक्षण घेतलं आहे. तर तिने मयूर पहाडीसोबत २०१५ मध्ये लग्न केलं. २०१७ मध्ये नोव्हेंबरमध्ये तिला एक मुलगी झाली. त्यानंतर तिने मालिकेत काम करणं बंद केलं. दिशा वकानीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. ती 'देवदास', 'मंगल पांडे: द राइजिंग', 'जोधा अकबर', 'सी कंपनी', 'लव स्टोरी 2050' या सिनेमांमध्ये दिसली आहे.