Join us

'तारक मेहता का...'मध्ये दयाबेनची एन्ट्री?, पण आहे हा ट्विस्ट; जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 8:34 PM

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही मालिका खूप आवडते. आता लहान मुलांसाठी मालिकेचे अॅनिमेटेड व्हर्जन सुरू करण्यात आले आहे. या अॅनिमेटेड व्हर्जनमध्ये दयाबेन, जेठालाल, टप्पू, बापूजी, पोपटलाल आणि शोच्या अन्य कलाकारांचे देखील अॅनिमेटेड व्हर्जनमध्ये दिसणार आहे. 

या मलिकेचे निर्माते असित मोदी यांनी दयाबेन अॅनिमेटेड व्हर्जनमध्ये दिसेल असे सांगितले आहे. 'ओरिजिनल शोमध्ये दयाबेन नसली तरी अॅनिमेटेड व्हर्जनच्या माध्यमातून दयाबेन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.' 

असित मोदी पुढे म्हणाले, 'माझ्या मालिकेला १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. मला लहान मुलांसाठी मालिकेचे अॅनिमेटेड व्हर्जन लाँच करायचे होते. आता माझे स्वप्न पूर्ण होत आहे. सोनी चॅनेलच्या एसोसिएशनच्या माध्यमातून माझे आणि टीमचे हे स्वप्न पूर्ण होत आहे.' 

ओरिजनल मालिकेत दयाबेन पहायला मिळणार नसली तरी  तारक मेहता का छोटा चश्मामध्ये दयाबेन नक्की पहायला मिळणार आहे. यावर असित मोदींनी सांगितले की, हो इथे दयाबेन आहे आणि अॅनिमेटेड व्हर्जनमध्ये मला टेन्शन नाही की कोणता आर्टिस्ट सोडून गेला तर. सर्व अॅनिमेटेड आहे तर जे दयाभाभीला मिस करत आहेत त्यांना दयाबेन अॅनिमेटेड सीरिजमध्ये पहायला मिळणार आहे. यात छोटी टप्पू सेना देखील पहायला मिळणार आहे.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही सोनी सब वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. जुलै २००८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि तेव्हापासून टीव्हीवर  सुरु आहे.  ही मालिका 'दुनिया ने ऊंधा चश्मा' या साप्ताहिक कॉलमवर आधारित आहे.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानी