Marathi Movies Box Office Clash : कोरोना महामारीच्या काळात सिनेइंडस्ट्री जणू ठप्प पडली होती. पण कोरोनाचं संकट निवळल्यावर इंडस्ट्री पुन्हा एकदा रूळावर आली आहे. अनेक नवे सिनेमे चित्रपटगृहांत झळकत आहेत. एकापाठोपाठ एक सिनेमे रिलीज होत असल्याने अनेक सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळतेय. येत्या काळात, दोन मराठी सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहेत. हे दोन सिनेमे कोणते, तर ‘दे धक्का 2’ ( De Dhakka 2 )आणि ‘एकदा काय झालं’ (Ekda Kay Zala). होय, हे दोन्ही मराठी सिनेमे एकाच दिवशी रिलीज होत असल्याने दोघांमध्येही क्लॅश रंगणार आहे.
‘दे धक्का 2’ हा सिनेमा 5 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता.‘दे धक्का’ चित्रपटातील सर्व कलाकार ‘दे धक्का 2’मध्येही दिसून येणार आहेत. यावेळी कथा लंडनमध्ये घडताना दिसणार आहे. त्यामुळे चाहते चित्रपटासाठी फारच उत्सुक झाले आहेत. ‘दे धक्का’ हा चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट हॉलिवूडमधील 2006मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लिटिल मिस सनशाइन’ या चित्रपटावर आधारित होता. या चित्रपटाचा कन्नडमध्ये ‘क्रेझी कुटुंब’ म्हणून रिमेक करण्यात आला होता.
एकदा काय झालं!
डॉ. सलील कुलकर्णी यांचा ‘एकदा काय झालं’ हा सिनेमादेखील 5 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेता सुमीत राघवन मुख्य भूमिकेत आहे. तर मोहन आगाशे, सुहास जोशी, उर्मिला कोठारे, पुष्कर श्रोत्री अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
‘दे धक्का 2’ आणि ‘एकदा काय झालं’ हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी म्हणजेच 5 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. आता यापैकी कोणता सिनेमा बाजी मारतो, ते बघूच.