२००८ साली रिलीज झालेला चित्रपट 'दे धक्का' सुपरहिट ठरला होता. हा चित्रपट रसिकांना भावला आणि चित्रपटातील कलाकारांना तसेच त्यांच्या भूमिकांना रसिकांनी डोक्यावर घेतले. सिद्धार्थ जाधवचा अतरंगी अंदाज आणि त्याला मकरंद अनासपुरेचा गावरान बाज रसिकांना भावला. शिवाय शिवाजी साटम, मेधा मांजरेकर यांच्याही या चित्रपटात भूमिका होत्या.'दे धक्का' या चित्रपटात दोन बालकलाकरांनी त्यांच्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली होती. ते बालकलाकार म्हणजे सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य. मात्र आता हे बालकलाकार मोठे झालेत आणि त्यामुळे त्यांचा लूकही. गौरीने दे धक्का चित्रपटात सायली ही भूमिका साकारली होती. 'दे धक्का' चित्रपटाची कथा जिच्या डान्स स्पर्धेभोवती फिरत होती ती भूमिका गौरीने साकारली. तिच्यावर चित्रीत झालेलं उगवली शुक्राची चांदणी हे गाणे हिट ठरले होते. या चित्रपटातील याच गाण्यामुळे गौरीला ओळख आणि लोकप्रियता मिळाली.
२०१५ साली तिने आवाहन चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट २००७ साली आलेल्या तामिळ चित्रपटाचा रिमेक होता. यांत तिने रूपा नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती.
तिच्यासोबत सचिन खेडेकर, मनोज जोशी, कश्मीरा शाह, अमृता खानविलकर, सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यामुळे आता पुन्हा गौरी चित्रपटात झळकणार का याची उत्सुकता आहे.