Join us

कर्जाचा डोंगर, घरावर जप्ती; वयाच्या १५व्या वर्षापासून गश्मीरनं फेडलं रवींद्र महाजनींवरचं कर्ज, म्हणाला - रस्त्यावर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 11:11 AM

Gashmeer Mahajani And Ravindra Mahajani : अभिनेता गश्मीर महाजनीने एका मुलाखतीत वडिलांच्या जीवनातील अनेक पैलू या मुलाखतीत उलगडले आहेत.

अभिनेता गश्मीर महाजनी(Gashmeer Mahajani)ने एका मुलाखतीत वडिलांच्या जीवनातील अनेक पैलू या मुलाखतीत उलगडले आहेत. रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांची जगण्याची पद्धतच निराळी होती. त्यांना कुटुंबासोबत राहायला आवडत नव्हते. त्यांना स्वतंत्र राहायला आवडायचे. स्वतःचा स्वयंपाक ते स्वतः बनवायचे. दुसऱ्यांनी त्यांची केलेली कामं त्यांना पटायची नाही, असे गश्मीरने सांगितले. या मुलाखतीत गश्मीरने वडिलांवरील कर्ज कसे फेडले आणि त्याला त्यासाठी काय काय करावे लागले, याबद्दल खुलासा केला.

गश्मीर महाजनीने मित्र म्हणे या पॉडकास्ट शोला मुलाखत दिली. त्यावेळी तो म्हणाला की, त्यावेळी मी १५ वर्षांचा होतो, माझी दहावी झाली होती आणि त्यावेळी समजले की वडिलांवर कर्ज आहे. वडिलांनी घर सोडून निघून जायचा निर्णय घेतला. घर आईच्या नावावर होते. ते म्हणाले की आता तुम्ही तुमचे बघा. त्यावेळी मी १५ वर्षांचा होतो आणि सोबत आई. बँकेच्या रिकव्हरी डिपार्टमेंटची लोक पाहून भीती वाटायची. ते सगळे एकदम घरी आले, घर सील करणार, नोटीस लावणार असे म्हणू लागले. आम्ही बँकेत जाऊन त्यांच्या हाता-पाया पडलो आणि सांगितले की बाबा नसले तरी आम्ही कर्ज फेडू. जर तुम्ही घर जप्त केले तर आम्ही जाणार कुठे, आम्ही कर्ज फेडू शकणार नाही. मग बँकेने आम्हाला हप्ते ठरवून दिले.

गश्मीरने असे फेडले कर्जकर्ज फेडण्यासाठी गश्मीर रस्त्यावर जाऊन पोस्टर लावायचा. १५-१६ वर्षांचा मुलगा रात्री पोस्टर्स लावतोय, हे पाहून पोलिसांनी पडकले तर, अशी काळजी त्याच्या आईला वाटायची. त्यामुळे तीदेखील त्याच्यासोबत यायची. वयस्कर बाई आहे म्हटल्यावर तुला प्रॉब्लेम येणार नाही, असे त्याची आई सांगायची, असे त्याने सांगितले. गश्मीर पुढे म्हणाला की, नंतर इव्हेंट्स मिळवले, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली. डान्सची संस्था सुरू केली. पण मला कॉर्पोरेट इव्हेंट्समधून पैसा मिळाला आणि कर्ज फेडण्यात मदत झाली.

टॅग्स :रवींद्र महाजनीगश्मिर महाजनी