Join us

या ‘फ्लॉप’ अ‍ॅक्टरची लेक आहे चांगलीच हॉट, 13 व्या वर्षी झाली होती किडनॅप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 08:00 IST

23 वर्षांची समारा इन्टाग्रामवर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे अनेक हॉट फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

ठळक मुद्देसमाराने एका शॉर्ट फिल्ममधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

अभिनेता दिपक तिजोरी बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. इतकेच काय पण बॉलिवूडच्या कुठल्याही इव्हेंटमध्येही तो दिसत नाही. पण दिपक तिजोरीची मुलगी समारा तिजोरी मात्र सतत चर्चेत असते. 23 वर्षांची समारा इन्टाग्रामवर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे अनेक हॉट फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

2009 मध्ये याच समाराचे अपहरण झाले होते. त्यावेळी ती 13 वर्षांची होती. मुंबईच्या लोखंडवाला भागात काही लोकांनी समाराला बळजबरीने आॅटोमध्ये ओढले आणि हॉटेलमध्ये घेऊन गेले. पण समारा कशीबशी या हॉटेलमधून पळाली होती.

समाराच्या आईचे नाव शिवानी तनेजा आहे. ती एक डिझाईनर आहे. 

दिपक तिजोरीचे विवाहबाह्य संबंध उघडकीस आल्यानंतर पत्नीने त्याला घराबाहेर काढले होते. शिवाय घटस्फोटासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता.

समाराला लहान भाऊ आहे. त्याचे नाव करण तिजोरी आहे.

समाराने एका शॉर्ट फिल्ममधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. ‘ग्रँड प्लान’ नामक या शॉर्ट फिल्ममध्ये समाराने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा लांघल्या होत्या. यात तिने प्रचंड हॉट सीन्स दिले होते.

अर्थात यानंतरही समाराचे नाणे काही चालले नाही. तूर्तास सोशल मीडियावर स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करून ती चर्चेत असते.

टॅग्स :दीपक तिजोरी