Join us

अरे देवा! दीपिका पादुकोणने चुकून केला आलिया-रणबीरच्या लग्नाचा खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 10:50 AM

लवकरच रणबीर-आलियालग्न करणार, अशीही चर्चा आहे. या चर्चेत किती सत्यता आहे, हे कळायला मार्ग नव्हता. पण चुकून का होईना दीपिका पादुकोणने पोल खोलली. 

ठळक मुद्देतुम्हाला आठवत असेलच की, दीपिकाच्या लग्नाआधी आलियानेही तिच्या लग्नाची बातमी फोडली होती.

रणबीर कपूर आणि आलिया भट या कपलचा रिअल लाईफ रोमान्स गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. लवकरच हे कपल लग्न करणार, अशीही चर्चा आहे. या चर्चेत किती सत्यता आहे, हे कळायला मार्ग नव्हता. पण चुकून का होईना दीपिका पादुकोणने रणबीर-आलियाच्या या सीक्रेटची पोल खोलली. होय, दीपिकाने एका ताज्या मुलाखतीत चुकून खुलासा केला. नुकतेच आलिया, रणवीर सिंग, आयुष्यमान खुराणा, मनोज वाजपेयी, साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा असे सगळे एका इव्हेंटच्या निमित्ताने एकत्र आलेत.

‘इंडस्ट्रीतील कोणत्या अ‍ॅक्टरला तुम्ही सल्ला देऊ इच्छिता?’ असा प्रश्न या इव्हेंटमध्ये सगळ्यांना करण्यात आला.  विजय देवरकोंडा याने सर्वप्रथम याचे उत्तर दिले. ‘सल्ला तर नाही पण न लाजता मी याठिकाणी एका गोष्टीची कबुली देऊ इच्छितो. ती म्हणजे, इथे बसलेल्या काहींवर मला क्रश होता. दीपिका आणि आलिया या दोघांवरही मी प्रेम करायचो. पण दीपिकाचे ती लग्न झालेय,’असे विजय देवरकोंडा म्हणाला. तो वाक्य पूर्ण करणार त्याआधी, ‘आणि आलियाचे लग्न होणार आहे,’ असे दीपिका म्हणाले. दीपिकाच्या तोंडून हे वाक्य निघताच, आलियाने तिला टोकले. यानंतर दीपिकाला लगेच आपल्या चुकीची जाणीव झाली. मग काय, मित्रांनो मी असाच टोला मारला, असे हसत हसत दीपिका म्हणाली. या इव्हेंटचा व्हिडीओही तुम्ही पाहू शकता.

तुम्हाला आठवत असेलच की, दीपिकाच्या लग्नाआधी आलियानेही तिच्या लग्नाची बातमी फोडली होती. करण जोहरच्या चॅट शोमध्ये दीपिका व रणवीर लवकरच लग्न करणार असल्याचा खुलासा तिने केला होता. या चॅट शोमध्ये दीपिका व आलिया गेस्ट म्हणून सहभागी झाले होते.

टॅग्स :दीपिका पादुकोणआलिया भटरणबीर कपूर