चंद्रशेखर टिळक/ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - विजय मल्ल्या यांची "किंगफिशर" एकदम फॉर्ममध्ये असण्याचा तो काळ होता. त्यात मिळणाऱ्या उत्कृष्ट सेवेमुळे प्रवासी खूश होते. त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचाही सल्ला अनेक जण देत होते. मी मात्र त्याच्याशी बिलकूल सहमत नव्हतो. मला माझे अनेक मित्र, सहकारी, वाचक, श्रोते ते शेअर्स तेव्हा खरेदी करावे का म्हणून अनेकदा, अगदी सतत, विचारत होते. आणि मी "माझे मत तरी नाही असे आहे. याउपर पैसे आणि निर्णय तुमचा असल्याने खरेदी करायची तर करा" असे उत्तर देत असे. त्यावर वैतागून एकदा माझ्या तरुण सहकाऱ्यांनी मला घेरावच घातला. " मी किंगफिशरबाबत पूर्वग्रहदूषित आहे का ? " , विजय मल्ल्या मला आवडत नाहीत का ?, त्यांनी मला किंगफिशरचे प्रसिद्ध कॅलेंडर दिले नाही का ?, आणि म्हणून मी किंगफिशरचे शेअर्स घेऊ नाहीत, असे सांगतो का ?, " अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. मी हसून वेळ टाळण्याचा खूप प्रयत्न केला. पण ते काही पिच्छा सोडेनात. त्यामुळे शेवटी मी त्यांना सांगितले की मला हे शेअर्स खरेदी योग्य वाटत नाहीत. त्यांनी त्यामागचे कारण विचारले. तेंव्हा मी त्यांना म्हणले की तुम्ही पेपर्स वाचत नाही का? वर्तमानपत्राचा कोणता भाग हा त्यावर त्यांचा पुढचा प्रश्न. " सीने जगताविशयिची पाने " या माझ्या उत्तराने तर अक्षरशः चक्रावले. तेंव्हा एक सुप्रसिद्ध सीने अभिनेत्री आणि किंगफिशरच्या विजय मल्ल्या यांचा मुलगा यांच्या "मैत्रीची" चर्चा रंगात होती.
माझ्या आधीच्या उत्तराने गोंधळून गेलेल्या तरुण सहकाऱ्यांना त्याचा संदर्भ देत मी म्हणले की "माझा त्या अभिनेत्री वर जास्त विश्वास आहे. तिचे आणि सिद्धार्थ मल्ल्या यांचे बिनसले अशी काही वर्तमान पत्रात बातमी फिरत आहे. हे बिनसन्याचे खरे कारण काही वेगळे असेल; पण त्याचा एक अर्थ आता किंगफिशरमध्ये Profitability ही राहिली नसावी आणि Liquidity ही राहिली नसावी . किंवा तीला ही मंडळी संबंध राखण्याजोगी वाटली नसावी . ही अभिनेत्री इतकी समंजस, हुशार, चाणाक्ष आहे की मला तिच्या फीलिंगबद्दल खात्री आहे. त्यामुळे मला या समूहातील कंपनीचे शेअर्स खरेदी योग्य वाटत नाहीत. " माझ्या या उत्तराने माझ्या सहकार्याचे समाधान झाले की नाही आणि त्यांनी किंगफिशरच्या शेअर्सची तेंव्हा खरेदी केली की नाही हेही मला माहीत नाही. पण अशा बादरायण कारणातून आपण आपल्या गुंतवणुकीबाबत निर्णय घेऊ शकतो. असे अपारंपरिक घटक, अप्रचलित अशी विश्लेषणाची त-हा अनेकदा फार उत्तम संदर्भ (आपल्या सोप्या मराठीत Clues हो ) देऊन जातात. आपण त्यांचा योग्य आणि वेळच्या वेळी उपयोग करण्याचे धाडस दाखवतो का हा खरा प्रश्न आहे. असा काहीसा अपारंपरिक विचार आपल्या गुंतवणुकीबाबत करायचा झाला तर आपण प्रसिद्ध सीने-अभिनेत्री दीपिका पदुकोनसारखे असावे असे मला अनेकदा वाटते. आजपर्यंत प्रसार - माध्यमांनी तिचे नाव निहार पंड्या ते रणवीर सिंग पर्यंत किती जणांशी जोडले. पण ते खरे आहे की खोटे याबाबत ती कधीही एक चकार शब्द जाहीरपणे बोलत नाही. तिचा हा संयम आपण आपल्या गुंतवणुकीला उपयोगात आणू शकू का ? जर हे खरे आहे, असे क्षणभर मानले तर इतक्या मोकळेपणाने आपण गुंतवणुकीची इतकी साधने उपलब्ध असतात त्यांचा साधक - बाधक विचार करतो का ? दीपिका पदुकोन आणि रणबीर कपूर यांचे प्रेमप्रकरण आणि मग विभक्त होणे याचीही चर्चा प्रसार - माध्यमात रंगली होती. पण त्याचा परिणाम स्वतःच्या कारकिर्दीवर होऊ न देण्याची खबरदारी दीपिका पदुकोनने उत्तम प्रकारे घेतली. अगदी रणबीर कपूर बरोबरच्या सिनेमात काम करतानासुद्धा. यांतून योग्य तो बोध घेत आपले भावनिक विश्व आणि व्यावसायिक निर्णय यांत गल्लत न करण्याची वृत्ती आपण अंमलात आणणार का ? एकंदरीतच व्यावसायिक क्षेत्रात आणि त्यातही विशेषतः गुंतवणूक क्षेत्रात यशस्वीरीत्या कार्यरत होण्यासाठी या गुणांची अत्यंत आवश्यकता असते. दीपिका पदुकोन या अभिनेत्रीचा गुंतवणूक क्षेत्रासंबंधी विचार करावा, असे मला वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे काही काळापूर्वी तिच्या अभिनयापेक्षा तिच्या शारीरिक सौंदर्याचे अनुचित चित्रण एका नामांकीत चित्रं - वाहिनीने केले. दीपिका पदुकोन सिने सृष्टीत कार्यरत असूनही तिने त्या वजनदार समूहांच्या वाहिनीला ज्या पध्दतीने फैलावर घेतले त्याला तोड नाही, असे वागायला धाडस लागते. स्वतःच्या डिसेन्सीची चाड लागते आणि प्रचंड आत्मविश्वास आणि स्वतःच्या हक्कांविषयी जागरूकता लागते. आपण गुंतवणूकदार अशी जागरूकता, धाडस, आत्मविश्वास आपल्या गुंतवणूकदार म्हणून असणाऱ्या हक्कांबाबत कधी दाखवणार? दीपिकाने अगदी अलीकडे अतिशय मोकळेपणाने तिला आलेल्या औदासिन्याबाबत ज्या पद्धतीने चर्चा केली ते तर केवळ स्तिमित करणारे आहे. अतोनात मनोबल हवे त्यासाठी ! आपण गुंतवणूकदार स्वतःच्या गुंतवणुकीबाबत विचार करताना इतक्या मोकळेपणाने निदान विचार, अगदी स्वतःशीच तरी करू शकतो का ? करतो का ? त्याची आवश्यकता सतत जाणवत असताना तरी ? कारण गुंतवणूक क्षेत्र, त्यातही विशेषतः शेअर - बाजार हे क्षेत्र असे आहे की तिथे भल्या - भल्यांचे निर्णय चुकू शकतात. अशा चुकलेल्या निर्णयाने आर्थिक नुकसान ही होऊ शकते. तुमच्या - माझ्यासारख्या सर्वसामान्य लहान गुंतवणूकदारांची अशी आर्थिक क्षमता मुळातच बेताची असते . त्यामुळे असा धक्का सहन करणे कठीण जाते . पण अनेकदा आपण त्यातच गुरफटून पडतो . दीपीका ने जाहीरपणे स्वतःच्या डिप्रेशनची कबूली दिली. अगदी तीही आपणहून . आपण निदान स्वतःशीच ते मान्य करून आपला निर्णय दुरुस्त करणार की नाही ? तसेच अशी चूक आपल्या हातून पुन्हा होणार नाही अशी खबरदारी बाळगणार ना ? दीपीका जशी स्वतःला कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेत सहजतेने पेश करत राहते आणि तरीही ती कधीही cheap वाटत नाही ; तसे आपण गुंतवणूक क्षेत्राची स्थिति काहीही असली तरी स्वतःला सावरून घेतो का हाही एक प्रश्नच आहे नाही का ! प्रसिद्ध अभिनेत्री रेखाच्या हातून काही महिन्यान्पुर्वी पारितोषिक स्वीकारताना दीपीका ने तिचे वडील नामवंत खेळाडू प्रकाश पदुकोन यांनी तीला लिहिलेले पत्र वाचून दाखवले होते . अशी आचार - संहिता आम्ही आमच्या गुंतवणुकीला लावू शकलो तर ? दीपीका , तुझे हे रूप पाहिले ना की तू भारतीय बॅडमिंटन चा पहिला चम्पियन , ऑल इंग्लेंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय सुस्वभावी प्रकाश पदुकोन ची मुलगी आहेस हे मनोमन सुखावत राहते . अशी पिढीजात सम्रुध्धी आमच्या वाट्याला आमची पुढची पिढी आणि गुंतवणूक क्षेत्र . . . . दीपिका , तू माझी आवडती अभिनेत्री असण्यात तुझ्या अभिनय - सौंदर्य - व्यक्तिमत्व याच्या बरोबरीने याही गुणांचा समावेश आहे ग ! आणि म्हणून तर तुझी तुलना आपल्या गुंतवणूक क्षेत्राशी करण्याचा मोह आवरता नाही आला मला.