Join us

लग्नानंतर पहिल्यांदाच दीपिका पादुकोण होणार रणवीर सिंगची ऑनस्क्रीन पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 12:10 IST

रणवीर सिंगसाठी 2018 हे वर्ष खूपच खास आहे. गत नोव्हेंबरमध्ये रणवीने दीपिका पादुकोणसोबत सहा वर्षांच्या रिलेशनशीपनंतर लग्न केले.

ठळक मुद्देरणवीर लवकरच  '८३' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.या सिनेमात दीपिका पादुकोणला देखील भूमिका ऑफर करण्यात आली आहे

रणवीर सिंगसाठी 2018 हे वर्ष खूपच खास आहे. गत नोव्हेंबरमध्ये रणवीने दीपिका पादुकोणसोबत सहा वर्षांच्या रिलेशनशीपनंतर लग्न केले. रणवीरच्या प्रोफेशनल लाईफबाबत बोलायचे झाले तर 2018च्या वर्षा अखेरीस रिलीज झालेला 'सिम्बा' बॉक्स ऑफिसवर हिट गेला. दीपवीरच्या फॅन्ससाठी नव्या वर्षात एक सरप्राईज आहे. 

रिपोर्टनुसार दीपिका पादुकोण लग्नानंतर पहिल्यांदाच ऑनस्क्रीन रणवीर सिंगच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. रणवीर लवकरच  '८३' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. यात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. डेक्कन क्रोनकिलच्या रिपोर्टनुसार सिनेमात कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेसाठी दीपिका पादुकोणला विचारण्यात आले आहे. जर दीपिकाने या भूमिकेसाठी होकार दिला तर हा सिनेमाच्या दीपवीरच्या फॅन्ससाठी एक स्पेशल ट्रीट असणार आहे. या भूमिकेसाठी आधी कॅटरिना कैफचे नाव चर्चेत होते. मात्र आता ही भूमिका दीपिका पादुकोण साकारणार असल्याची चर्चा आहे.  

'८३'  या सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. दिग्दर्शक कबीर खान या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे.  हा सिनेमा १० एप्रिल, २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रणवीर सिंगच्या 'गली बॉय' पुढच्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर दीपिका पादुकोण मेघना गुलजारच्या 'छपाक’मध्ये दिसणार आहे. 

टॅग्स :दीप- वीरदीपिका पादुकोणरणवीर सिंग