बॉलिवूडचं मोस्ट लव्हेबल कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह एकमेकांची कंपनी खूप जास्त एन्जॉय करत आहे. हे कपल प्रत्येक क्षण एकमेकांसोबत शेअर करतात. दोघेही अनेकदा मजेशीर क्षणांचा आनंद लुटताना दिसतात. आता दीपिकाने एक मीम शेअर केलं आहे. ज्यामध्ये तिने रणवीर सिंहला टॅग केलं आहे. या पोस्टसोबतच दीपिकाने एक मजेदार मेसेजही लिहिला आहे, जो पाहून चाहत्यांना हसू आवरत नाही.
दीपिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक मीम शेअर केलं आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती प्लान्ट विकत घेण्याचा आग्रह करत आहे, तर दुसरी व्यक्ती तिला ते करताना थांबवत आहे. ज्या व्यक्तीने प्लान्ट खरेदी करण्यापासून थांबवलं तो "तुझ्याकडे पुरेसे प्लान्ट्स आहेत" असं म्हणत आहे. तर दुसरीकडे दुसरी व्यक्ती "पण माझ्याकडे हे प्लान्ट नाही" असं म्हणत आहे. या इन्स्टा स्टोरीमध्ये दीपिकाने रणवीर सिंहला टॅग केले आहे.
रणवीर आणि दीपिकाच्या नात्याची सुरुवात 'गोलियों की रासलीला राम लीला' चित्रपटादरम्यान झाली होती. यानंतर दोघे आणखी दोन चित्रपटांमध्ये एकत्र दिसले. या दोघांच्या नात्याचं 2018 मध्ये लग्नात रूपांतर झालं. सध्या हे जोडपं आपलं वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहे.
दीपिका सिद्धार्थ आनंदच्या एक्शन एडव्हेंचर फिल्म 'पठाण'मध्ये दिसली होती, ज्यात शाहरुख खान आणि जॉन अब्राहम देखील होते. या चित्रपटात त्याने हाय-ऑक्टेन एक्शन सीक्वेन्स केले. तो वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ठरला. आता अभिनेत्री तिच्या आगामी 'फायटर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत हृतिक रोशन दिसणार आहे. यासोबतच ती शाहरुखच्या मोस्ट अवेटेड 'जवान' या चित्रपटातही दिसणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.